हायवेवर होतेय वाऱ्याशी स्पर्धा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:11 PM2018-11-29T23:11:22+5:302018-11-29T23:11:26+5:30

संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : महामार्ग आता सहापदरी होतोय, त्यामुळे साहजिकच वाहतुकीचा वेग वाढतोय; पण या ...

Highly on air competition! | हायवेवर होतेय वाऱ्याशी स्पर्धा !

हायवेवर होतेय वाऱ्याशी स्पर्धा !

Next

संजय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : महामार्ग आता सहापदरी होतोय, त्यामुळे साहजिकच वाहतुकीचा वेग वाढतोय; पण या वाढत्या वेगामुळे अपघाताचे प्रमाणही वाढतंय़ शेंद्रे ते पेठनाका या ८७ किलोमीटरच्या पट्ट्यात गेल्या चार वर्षांमध्ये तब्बल ८०९ अपघात झालेत़ त्यामध्ये १२५ जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर ८५६ जण जायबंदी झालेत़
स्टेअरिंगवर हात, अ‍ॅक्सिलेटरवर टाच, डोळ्यावर गॉगल अन् बंद काचा़ ‘स्पीडॅमीटर’चा काटा क्षणाक्षणाला पुढे सरकतो़ १००़़़ ११०़़़ १२० ़़़ तर कधी त्याही पुढे; पण जोपर्यंत अडथळा येत नाही, तोपर्यंत चालकाची ‘अ‍ॅक्सिलेटर’वरची टाच हटत नाही़ लक्ष कुठंही असलं तरी गाडीचा वेग मात्र वाढतच असतो़ बंद काचांमुळे वेगाची जाणीव होत नाही अन् ज्यावेळी जाणीव होते, त्यावेळी वाहनावर चालकाचा ताबा राहत नाही़ शेंद्रे ते पेठनाकादरम्यान चालकाचा ताबा सुटल्यानेच अनेक वाहने अपघातग्रस्त झाली आहेत़ त्यामध्ये काही वाहनांचा तर अक्षरश: चक्काचूर झालाय.
वास्तविक, महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे कोल्हापूर ते सातारा व सातारा ते कोल्हापूर या दोन्ही लेनवर एकेरी वाहतूक आहे. त्यामुळे समोरून येणाºया वाहनाला धडक बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, तरीही इतर राज्यमार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावरच जास्त आणि भयानक अपघात होतात. अनियंत्रित वेग, मोठ्या आवाजात लावली जाणारी म्युझिक सिस्टीम, चुकीच्या पद्धतीने होणारा ओव्हरटेकचा प्रयत्न, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सहप्रवाशाशी बोलणे, विश्रांती न घेता तासन्तास वाहन चालविणे, चालकाचे मद्यप्राशन आदी कारणे अपघाताला निमंत्रण देतात.
शेंद्रे ते पेठनाकादरम्यान वारंवार भयानक अपघात होतायत. चालकांनी सावधानता बाळगावी, यासाठी ठिकठिकाणी फलकही लावले गेलेत. मात्र, या फलकांकडे कोणताही चालक म्हणावे तेवढे लक्ष देत नाही, त्यामुळे अडथळ्याची अथवा धोक्याची पूर्वसूचना चालकाला मिळत नाही. परिणामी, ऐनवेळी समोर आलेला अडथळा किंवा धोका टाळण्याच्या प्रयत्नात ताबा सुटून वाहने अपघातग्रस्त होतात. बहुतांश अपघातांत चालकाचा बेदरकारपणा प्रवाशांच्या जीवावर बेततो. रस्त्याकडेला थांबलेल्या वाहनाला चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुसºया वाहनाची धडक बसते. वाहन नियंत्रित न झाल्यानेच हे अपघात घडतात. गत काही वर्षात झालेल्या अपघातांचा विचार करता बहुतांश अपघात बेजबाबदार चालकांमुळे झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
‘स्पीडगन’ कहाँ है?
महामार्गावर प्रतितास जास्तीत जास्त ८० पर्यंतचा वेग निर्धारित करण्यात आला आहे़ धावत्या वाहनांच्या वेगाची तपासणी करण्यासाठी महामार्ग पोलिसांना ‘स्पीडगन’ही पुरविण्यात आल्या आहेत़ मात्र, त्या ‘स्पीडगन’चा वापरच होत नसल्याची परिस्थिती आहे. वेगमर्यादा ओलांडल्याने होणारी कारवाई नगण्य असल्यामुळे वेगाच्या मर्यादेचे भान चालकांना राहत नाही. परिणामी, अनेकवेळा अपघाताचा सामना करावा लागतो.

Web Title: Highly on air competition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.