‘गौरव भूषण’ पुरस्काराने ११ सातारकरांचा सन्मान

By admin | Published: June 16, 2015 10:24 PM2015-06-16T22:24:58+5:302015-06-17T00:39:47+5:30

या नृत्य सोहळयातच विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या ११ व्यक्तींचा गौरव खासदार उदयनराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

Gaurav Bhushan Award for 11 Satarkar Awards | ‘गौरव भूषण’ पुरस्काराने ११ सातारकरांचा सन्मान

‘गौरव भूषण’ पुरस्काराने ११ सातारकरांचा सन्मान

Next

सातारा : उदयनराजे भोसले फौंडेशन आॅफ कल्चरल अ‍ॅक्टीव्हीटीज आणि सातारा येथील डान्स मास्टर आणि नृत्य दिग्दर्शक पंकज चव्हाण यांच्या डान्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने सलग चौथ्या वर्षी साजऱ्या झालेल्या ‘डान्स धमाका स्टेप अप-२०१५’ ने आणि छत्रपती घराण्याकडून देण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्याच सातारा गौरव पुरस्काराने सोमवारची उत्साहात वितरण करण्यात आले. सोहळ्याचा शुभारंभ शिवाजीराजे भोसले यांचे हस्ते झाला. यावेळी उपनगराध्यक्षा दिपाली गोडसे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी नितीन पाटील, प्रांत मल्लीकार्जून माने, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, पंकज चव्हाण, प्रदीप चव्हाण यांची उपस्थिती होती. धडाकेबाज नृत्यांची लयलूट करीत बॉलिवूडमधील प्रितेश आणि ग्रुप, सिध्देश पै व ग्रुपचे नामांकीत ४० नृत्य कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली.या नृत्य सोहळयातच विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या ११ व्यक्तींचा गौरव खासदार उदयनराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ‘प्रतापसिंहराजे जीवन गौरव’ पुरस्कार फारुख कूपर यांना, ‘उद्योजक पुरस्कार’ बीव्हीजी ग्रॅुपचे हणमंतराव गायकवाड, ‘साहित्यिक पत्रकारिता’ कवी अशोक नायगांवकर, ‘कला व सांस्कृतिक‘ पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे, क्रिडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे अभय चव्हाण, ‘शिक्षण क्षेत्र’ पुरस्कार आपुलकी शिक्षण संस्थेच्या सुषमा पवार यांना, ‘आदर्श सेवा’ पुरस्कार संभाजी माने, एंटरप्रेनर कै. अशोक मोदी (पेढेवाले), ‘सामाजिक सेवा’ पुरस्कार डॉ. अविनाश पोळ, ‘विशेष कर्तृत्व पुरस्कार’ हाताने विहीर खणणाऱ्या सुभद्रा शेळके, ‘कृषी क्षेत्र पुरस्कार’ अंध असणारे दत्तात्रय सुर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला.यावेळी पंकज चव्हाण, सुनील काटकर, राजू गोडसे, रवींद्र झुटींग, बाळासाहेब ढेकणे, गोकुळ सारडा, प्रशांत नावंधर, उदय राठी, पंकज लाहोटी, आनंद करवा, राजु खंडेलवाल, किशोर लाहोटी, सारंग माजगावकर, चेतन शहा, पवन लाहोटी, राहूल पाटोळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Gaurav Bhushan Award for 11 Satarkar Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.