स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा शासनाला विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 01:55 PM2017-08-16T13:55:52+5:302017-08-16T14:06:54+5:30

सातारा : देशाला पारतंत्र्यांच्या जोखडातून सोडविणाºया स्वातंत्र्यसैनिकांच्या भाळी भलतीच उपेक्षा आल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही त्यांच्या पेन्शनचा प्रश्न निकालात निघाला नाही. स्वातंत्र्यसंग्रामात आहुती देणारे अनेकजण इहलोक सोडून गेलेत, तर काही जण अंथरूणाला खिळलेत. तर काहींच्या वारस असणाºया पत्नी शासन दरबारी हेलपाटे मारताना पाहायला मिळत आहेत.

The freedom fighter's government forgot! | स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा शासनाला विसर!

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा शासनाला विसर!

googlenewsNext
ठळक मुद्देसातारा जिल्हात पेन्शन प्रकरणे रखडली राष्ट्रप्रेमींची भलतीच उपेक्षाराज्य स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेकडून वर्षानुवर्षे पाठपुरावा

सातारा : देशाला पारतंत्र्यांच्या जोखडातून सोडविणाºया स्वातंत्र्यसैनिकांच्या भाळी भलतीच उपेक्षा आल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही त्यांच्या पेन्शनचा प्रश्न निकालात निघाला नाही. स्वातंत्र्यसंग्रामात आहुती देणारे अनेकजण इहलोक सोडून गेलेत, तर काही जण अंथरूणाला खिळलेत. तर काहींच्या वारस असणाºया पत्नी शासन दरबारी हेलपाटे मारताना पाहायला मिळत आहेत.


स्वातंत्र्यसैनिकांना लागू असलेली पेन्शन मिळावी, यासाठी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा केली असता तिथे ताकास तूर लागू दिली जात नसल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष विजय देशपांडे यांनी केला आहे.

शासनाने स्वातंत्र्यसैनिकांची हेटाळणी थांबविणार की नाही?  आता तरी पालकमंत्री विजय शिवथारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत निश्चय करून स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या वारसांचे प्रश्न सोडवतील का?, असा त्यांचा सवाल आहे. 

मरणाने केली सुटका...जगण्याने छळले होते...

१. शिवाजी यदू पवार : कामगार चळवळीतील कार्यकर्ता. गोवामुक्ती चळवळीतील सर्वात लहान विद्यार्थी म्हणून कै. कमल भागवत यांचा दाखला. पेन्शन मंजुरीसाठी पैशाची मागणी. ती देता न आल्याने १९९१ पासून मुंबई जिल्हाधिकारी व पोलिस कार्यालयांत हेलपाटे. पुरावा देऊनही प्रशासन म्हणते शासनाच्या दफ्तरी नोंद चढेना.

२. दत्त राऊ पाटील : मु. नांदगाव, ता. कºहाड येथील स्वातंत्र्यसैनिक. शासनाने त्यांना रीतसरपणाने सन्मानपत्र बहाल करून पेन्शन देण्याचे अभिवचन दिले. ते त्यांच्या हयातीत पाळले नाही. त्यांच्या विधवा पत्नी सरस्वती या पेन्शनची मागणी करतच मृत्यूमुखी पडल्या.

३. सुधाताई त्र्यंबक अभंग : यांचे पती दिवंगत त्र्यंबक रामचंद्र अभंग यांचा स्वातंत्र्यगीतांचा कविता संग्रह १९३४ साली ब्रिटिशांनी जप्त केला. त्यांना भाऊसाहेब सोमण, यशवंतराव चव्हाण, बाबुराव गोखले, किसन वीर, ना. ह. परुळेकर, नरुभाऊ लिमये, वि. स. खांडेकर, मुन्शी प्रेमचंद यांचे नेतृत्व लाभले. त्यांना तर सोडाच, त्यांच्या पत्नीलाही पेन्शन मिळाली नाही. सुधाताईंच्या निधनानंतर साताºयातील सामाजिक कार्यकर्त्यांनीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

४. मुमताज बालेखान मणेर : २८0, रविवार पेठ, कºहाड. त्यांचे पती दिवंगत बालेखान अब्दुल मणेर यांनी पुरावे सादर करून पेन्शनची मागणी केली, वय असल्याचे कारण सांगून ती फेटाळली. त्यांच्या पत्नी दिवंगत मुमताज यांच्या मागणी अर्जावरही निर्णय झाला नाही.

५. रा. वि. देशपांडे : रा. फलटण. गोवामुक्ती संग्रामात भाग. सामान्य प्रशासनाने मागणी करूनही जिल्हा प्रशासनाने हालचाल केली नाही. शेवटी उत्तराधिकारी संघटनेने पाठपुरावा करून कागदपत्रे सादर केली होती. पण निर्णय नाही.

६ यशोदा किसन घाडगे : यांचे पती दिवंगत किसन पांडुरंग घाडगे, रा. ओगलेवाडी, ता. कºहाड. पेन्शन मागणीचे प्रकरण १९६६ सालापासून मंजूर झालेले नाही. शासनाने त्यांना रीतसर सन्मानपत्र बहाल केले. उत्तराधिकारी संघटनेने पाठपुरावा केल्यानंतर त्यांना पेन्शन लागू झाली. पण गटबाजीमुळे व दबावामुळे शासकीय अधिकाºयांनी ती रद्द केली. तसेच दिलेली पेन्शन व्याजासकट वसूल करण्याचा कुटील डाव खेळला. या मन:स्तापाला कंटाळून इस्लामपूर येथे त्यांचे निधन झाले.

७. ताराबाई एकनाथ जाधव : यांचे पती दिवंगत एकनाथ शंकर जाधव रा. पुसेगाव, ता. खटाव यांनी ब्रिटिशांनी ३ डिसेंबर १९४२ साली अटक केल्याचे पुरावे जोडूनही त्यांना पेन्शन मिळाली नाही.

८. दामोदर विष्णू नेर्लेकर : रा. बनवडी, ता. कºहाड गोवामुक्ती संग्रामात योगदान दिले. गोवामुक्ती संग्रामातील नेत्यांच्या शिफारशींवरून पेन्शन देण्याचे शासनाचे धोरण. मात्र पेन्शन न घेताच त्यांचे निधन झाले.

९. भगवान विठोबा माळी : रा. शेणाली, ता. कºहाड पेन्शन न मिळाल्याने आजारपणाचा त्रास सहन करत जीवन कंठीत आहेत.

१0 रामचंद्र पांडुरंग दळवी, भीमराव, शंकर कदम, जगन्नाथ महादू जाधव : रा. सर्व ओगलेवाडी, ता. कºहाड सध्या आजारपणात वृध्दत्वाचे जीवन जगत आहेत.

११ दत्तू मारुती यादव : गोवारे, ता. कºहाड वृध्दत्वाचे जीवन जगत आहेत.

१२. डॉ. वामन गणेश भुर्के : शनिवार पेठ, कºहाड यांचे नुकतेच निधन झाले.

१३. भीमराव ज्योतिबा काटवटे : रा. १९0, रविवार पेठ, कºहाड वृध्दत्वाचे जीवन जगत आहेत.

१४. सिंधू लक्ष्मण घोरपडे : रा. गोजेगाव, ता. सातारा यांचे पती दिवंगत लक्ष्मण भिकू घोरपडे यांनी शासनाच्या निकषानुसार दोन वर्षे शिक्षा झाली होती. त्यांच्या निधनानंतर पत्नी सिंधू यांनी पेन्शनचा अर्ज करूनही ती मिळाली नाही. 

१५. नारायण भाऊ शिंदे : कुमठे, ता. कोरेगाव यांनी भूमीगत स्वातंत्र्यसैनिक पेन्शन मिळावी, म्हणून दि. २ जानेवारी १९९२ साली अर्ज केला होता. कुमठे ग्रामपंचायतीच्या आमसभेत ठराव मंजूर केला होता. 

१६. शशिकला रामचंद्र धर्माधिकारी : रा. कुरोली सिध्देश्वर, ता. खटाव. त्यांचे पती दिवंगत रामचंद्र पांडुरंग धर्माधिकारी यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. १९९४ साली त्यांचे निधन झाले. कागदपत्रे जळाल्याची व खराब झाल्यामुळे दाखले देता येत नसल्याचे प्रशासनाने कळविले. 

१७. मीरा व्यंकटराव यादव : रा. १६३, यादोगोपाळ पेठ, सातारा यांचे पती व्यंकटराव रामचंद्र यादव हे गोवामुक्ती संग्रामात गेले होते. त्यांना पेन्शन मिळण्याऐवजी त्यांचे दीर दिवंगत नारायण रामचंद्र यादव यांना पेन्शन दिली जात असल्याची तक्रार त्यांनी शासनदरबारी केली आहे. 

१८. गंगाधर केशव काळभोर : रा. किकली, ता. वाई. गोवामुक्तीमध्ये सहभाग. गिरणी कामगार. १९५५ मध्ये त्यांचा जाहीर सत्कार झाला होता. इंडियन इव्हिडंस अ‍ॅक्टनुसार पुरावा म्हणून त्यांचे प्रकरण न्याहाळावे, अशी मागणी उत्तराधिकारी संघटनेने केली आहे.


स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील स्वातंत्र्यसैनिक कक्षात दरमहा बैठक होते. या बैठकीतील एका निर्णयानुसार सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती विचारूनही ती मिळत नाही.
- विजय देशपांडे,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटना.

Web Title: The freedom fighter's government forgot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.