वीजनिर्मिती अन् सिंचनाच्या कात्रीत कोयनेचं पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:10 PM2019-04-30T23:10:25+5:302019-04-30T23:10:31+5:30

पाटण : कोयनेतील पाण्यासाठी सतत मागणी होत असून, मे महिन्याचे तब्बल ३१ दिवस हे धरणातील ४२.११ टीएमसी पाणीसाठ्याची खरी ...

Electricity and irrigation water! | वीजनिर्मिती अन् सिंचनाच्या कात्रीत कोयनेचं पाणी !

वीजनिर्मिती अन् सिंचनाच्या कात्रीत कोयनेचं पाणी !

Next

पाटण : कोयनेतील पाण्यासाठी सतत मागणी होत असून, मे महिन्याचे तब्बल ३१ दिवस हे धरणातील ४२.११ टीएमसी पाणीसाठ्याची खरी अग्निपरीक्षा घेणारे ठरणार आहेत. कारण, कडक ऊन आणि विजेची वाढती मागणी तर दुसरीकडे सांगलीकडील पिण्याचे पाणी, सिंचनासाठी सतत धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. अशा दुहेरी मागणीमुळे पाणीसाठा मे अखेरपर्यंत पुरणार का? असा प्रश्न आहे.
पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारा कोयना धरणाचा शिवसागर जलाशय हा तुडुंब भरलेला असतो; पण वर्षाच्या अखेरीस म्हणजेच मे महिन्यात कोयना धरणातील पाणीसाठा पुरेल की नाही याची चिंता लागलेली असते. कारण, कोयना धरणाचे पाणीसाठा वापराचे तांत्रिक वर्षे १ जून ते ३१ मे असे मोजले जाते. वर्षभरात कोयना धरणाच्या पाण्यावर वीजनिर्मिती होते. त्यासाठी ६७.०५ टीएमसी इतका पाणीसाठा राखीव ठेवला जातो. यावर्षी आतापर्यंत ४४.२६ टीएमसी पाणी वापर हा वीजनिर्मितीसाठी झाला तर पूर्वेकडील सिंचनासाठी २८.९६ टीएमसी पाणी पायथा वीजग्रह आणि नदी विमांचकमधून सोडण्यात आले. अजूनही पायथा वीजगृहातून २०० आणि नदी विमांचकमधून ९२४ क्युसेक पाणी दर दिवशी सोडण्यात येत आहे.
सध्या धरणात ४२.११ टीएमसी पाणीसाठा आहे. तर गतवर्षी तो ४९.८९ टीएमसी इतका होता. यावर्षी प्रथमच कोयना धरणाच्या भिंतीला असणाऱ्या सहा वक्र दरवाजांच्या तळाच्या नदी विमांचकामधून सांगलीकडे पाणी सोडण्यात येत आहे. तीव्र उन्हाळा आणि सांगली पाटबंधारे विभागाची सततची वाढती पाणी मागणी, हे यामागील कारण आहे.
पावसावर गणित

कोयना धरणाचे नवीन तांत्रिक वर्ष १ जून रोजी सुरू होत आहे. मात्र, जूनमध्ये वेळेवर पाऊस सुरू झाला नाही तर मात्र सर्व नियोजन कोलमडून धरणातील पाणीसाठा पुरेल की नाही, याची चिंता लागते. आता जून महिन्यात किती पाणीसाठा राहतोय? यावर पाण्याचे गणित अवलंबून राहणार आहे.

Web Title: Electricity and irrigation water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.