गाड्या अडवताच जिल्हाध्यक्ष ‘आत’ : दूध दरवाढीसाठी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:46 PM2018-07-17T23:46:29+5:302018-07-17T23:47:18+5:30

District President 'inside' stopped trains: Milk aggressive for price hike | गाड्या अडवताच जिल्हाध्यक्ष ‘आत’ : दूध दरवाढीसाठी आक्रमक

गाड्या अडवताच जिल्हाध्यक्ष ‘आत’ : दूध दरवाढीसाठी आक्रमक

Next
ठळक मुद्देसचिन नलवडेंना पोलिसांकडून अटक; दिवसभर स्थानबद्ध, दुसऱ्या दिवशीही आंदोलन

कऱ्हाड : दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू ठेवण्यात आहे. यावेळी सकाळी कऱ्हाड येथील कृष्णा नाक्यावर दुधाचे कॅन घेऊन जात असलेला टेम्पो संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी अडवला. याप्रकरणी पोलिसांनी सचिन नलवडे व योगेश झिंबरे या दोघांवर कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले व दिवसभर पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक करून सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेकडे नेण्यात आले.

दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून राज्यभर आंदोलनास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या दूध दरवाढ आंदोलनामुळे कोट्यवधी रुपयांचा फटकाही बसला आहे. ग्रामीण भागातील दूध संघासह दूध उत्पादक संघ व शेतकरी, खासगी व्यापाºयांनीही या आंदोलनास पाठिंबा दिल्याने कऱ्हाड तालुक्यात दीड लाख लिटरहून अधिक दूध संकलन ठप्प झाल्याचे दिसून आले.

सोमवारी पुकारलेल्या दूध दरवाढ आंदोलनाचा परिणाम मंगळवारी जाणवला. कºहाड शहरसह परिसरातील दूध डेअरी, दूधविक्री करणारे दुकाने आदी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली. दूध संकलन बंद केल्यामुळे शहरातील नागरिकांची मात्र चांगलीच कोंडी झाली.दरम्यान, मंगळवारी सकाळी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नलवडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. विद्यानगर येथून खोडशीयेथील कोयना दूध संघाकडे दुधाचे भरलेले कॅन घेऊन जाणारा टेम्पोनलवडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अडविला. याबाबत शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाडयांनी नलवडे तसेच योगेश झिंबरे या दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी लोकशाही मार्गाने करीत असलेल्या आंदोलनाला सरकारने सकारात्मक पाठिंबा न दिल्यास शेतकरीचआंदोलन हातात घेतील, असाइशारा जिल्हाध्यक्ष नलवडे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.कऱ्हाड तालुक्यात मंगळवारीही दूधविक्री व संकलन बंद ठेवण्यात आले होते. तसेच दूध उत्पादक शेतकºयांनी आपल्या दुधाचे वाटप दूध गावातील नागरिक, शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना केले.

या गावांतून मिळाला पाठिंबा
दूध दरवाढ आंदोलन यशस्वी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह पदाधिकाºयांनी कऱ्हाड तालुक्यातील गावागावात नियोजन बैठका घेतल्या होत्या. प्रत्येक गावातून आंदोलनास पाठिंबा देण्यात यावा, असे आवाहनही केले होते. त्यानुसार सुरू करण्यात आलेल्या आंदोलनास मंगळवारी पार्ले, केसे, वडोली निळेश्वर, बाबरमाची, राजमाची, कोपर्डे हवेली, करवडी, शामगाव, अंतवडी, रिसवड, मसूर, कोळेवाडी, पश्चिम सुपने, विंग, वडोली भिकेश्वर, खोडजाईवाडी, काले, कचरेवाडी, येणपे, चिखली, पाचपुतेवाडी, मालखेड, निगडी, शेणोली आदी गावांतील दूध उत्पादक शेतकºयांनी आपले दूध डेअरीला घातले नाही. तसेच या ठिकाणी दूध संकलन बंद ठेवण्यात आले.

सोमवारी नजरकैदेत तर मंगळवारी ताब्यात
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूधदर आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांवर चांगलाच वॉच ठेवला जात आहे. सोमवारी केलेल्या आंदोलनादरम्यान साध्या वेशातील पोलिसांनी जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यावर वॉच ठेवला गेला. तर मंगळवारी नलवडे यांना दुधाचा टेम्पो अडविल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले.
 


जिल्ह्यासह कऱ्हाड तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दूध संकलन दुसºया दिवशी बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला. कोणत्याही परिस्थिती दूध दरवाढीच्या मागण्या मान्य करायला सरकारला भाग पाडू, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या घामाच्या दामासाठी दूध बंद आंदोलनास सहकार्य करावे.
- अनिल घराळ, राज्य कार्यकारिणी सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा

Web Title: District President 'inside' stopped trains: Milk aggressive for price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.