पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडीजनीक अपघात, पुलावरून खाली पडून दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 14:52 IST2017-12-11T14:48:37+5:302017-12-11T14:52:19+5:30
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीनजीक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत पुलाचे काम सुरू असलेल्या पुलावरून खाली पडल्याने जागीच ठार झाले. अधिक तपास शिरवळ पोलिस करीत आहे.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडीजनीक अपघात, पुलावरून खाली पडून दुचाकीस्वार ठार
शिरवळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीनजीक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
बाळासाहेब नामदेव पवार (वय ४२) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, एका खासगी कंपनीत कामगार असलेल्या बाळासाहेब पवार (रा. बावडा, ता. खंडाळा) हे बावडा येथे दुचाकीवरून (एमएच ११ एएस ४०४७) घरी निघाले होते.
यावेळी धनगरवाडी गावच्या हद्दीत दुचाकी आले असता दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत पुलाचे काम सुरू असलेल्या पुलावरून खाली पडल्याने जागीच ठार झाले. अधिक तपास शिरवळ पोलिस करीत आहे.