‘हायवे’च्या पुलाचं भगदाड मुजेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:01 PM2017-11-19T23:01:25+5:302017-11-19T23:03:08+5:30

Bridge of Highway Bridge | ‘हायवे’च्या पुलाचं भगदाड मुजेना

‘हायवे’च्या पुलाचं भगदाड मुजेना

Next


पाचवड : पाचवड येथील उड्डाणपूल तयार झाल्यानंतरही महावितरणच्या हायटेन्शन लाईनमुळे अनेक महिने बंद ठेवण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या आदेशानंतर हायटेन्शन लाईन काढून घेतल्यानंतर १८ जुलै रोजी या उड्डाणपुलाची साताºयाहून पुण्याकडे जाणारी बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. मात्र उड्डाणपुलावरील पुणेहून साताºयाच्या दिशेने जाणाºया बाजूला भगदाड पडलेल्या ठिकाणी अजूनही डागडुजी सुरूच आहे. उड्डाणपूल लोखंडी पायाडावरच तग धरून असल्याने कामाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महामार्गाच्या सहापदरीकरणात भुर्इंज येथील किसन वीर कारखान्याकडे जाणारा पूल कोसळल्यानंतर काही दिवसांतच पाचवड येथील उड्डाणपुलाचा काही भाग कोसळून पुलास भगदाड पडलेले होते. सातºयाहून पुण्याकडे जाणारी लेन सुरू होऊन चार महिने झाले तरी पुण्याहून साताºयाकडे जाणाºया लेनची डागडुजी व नव्याने बांधकाम अजूनही सुरूच आहे. लोखंडाचे पायाड उभे करून काही दिवसांपासून या पुलाचे काम रात्री अकरानंतर सुरू करण्यात आल्याने दिवसा होणारे काम रात्रीचे का केले गेले ? या प्रश्नामुळे स्थानिकांबरोबरच परिसरातील लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. सहापदरीकरणात पाचवड येथे करण्यात आलेली सर्वच कामे अर्धवट स्वरुपात राहिल्यामुळे स्थानिक व वाहनचालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
डागडुजी
टिकणार का ?
उड्डाणपुलास भगदाड पडल्यानंतर त्याठिकाणी सुरुवातीला डांबर टाकून डागडुजी करण्यात आली. आता त्याठिकाणी नव्याने काम सुरू आहे. सुरू असलेल्या कामाचा दर्जा नक्की कोण तपासणार तसेच नव्याने करण्यात आलेले बांधकाम वाहतूक सुरू झाल्यानंतर किती टिकाव धरणार? याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत., आतापर्यंत झालेल्या व होत असलेल्या दर्जाहीन कामामुळे भविष्यात काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Bridge of Highway Bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.