खून जंगलात अन् वस्तरा नदीपात्रात!

By admin | Published: November 23, 2014 12:32 AM2014-11-23T00:32:07+5:302014-11-23T00:33:43+5:30

भारती हत्याप्रकरण : वाईतील चित्रपटाची वेळ हुकली अन् मांढरदेव डोंगरात घात झाला

Bloody and rustic river in the forest! | खून जंगलात अन् वस्तरा नदीपात्रात!

खून जंगलात अन् वस्तरा नदीपात्रात!

Next

वाई/मांढरदेव : खंडाळा येथे जीन्स कपडे खरेदी करून भारती भोसले आणि काका देवीचंद भोसले हे वाई येथे आले. त्याठिकाणी त्यांना चित्रपट पाहायचा होता; मात्र वेळ चुकल्याने त्यांनी ऐनवेळी मांढरदेवला जाण्याचा निर्णय घेतला अन् येथेच घात झाला आणि देवीचंदने भारतीचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत पिशवीवरून अवघ्या चोवीस तासांत गुन्ह्याचा छडा लावला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, भारती ही घराघरांत चहाड्या करून भांडणे लावते, पोलिसांना फोन करून सर्वांना त्रास देते म्हणून देवीचंद जगू भोसले (वय ४९) याला तिच्याविषयी राग होता. घटना घडली त्या दिवशी बुधवारी सकाळी दहाला देवीचंद भारतीशी गोड बोलून कपडे खरेदीसाठी खंडाळा येथे नेले. त्याठिकाणी एका दुकानात कपडे खरेदी करून तेथेच भारतीने नवीन कपडे घातले. जुने कपडे कॅरिबॅगमध्ये घेऊन ते दोघे वाईला आले. त्याठिकाणी चित्रपट पाहण्याचे त्यांनी ठरविले; मात्र वेळ निघून गेल्याने ‘काळूबाईच्या दर्शनाला जाऊ,’ असे सांगून त्यांनी रिक्षातून मांढरगड गाठले. दरम्यान, देवीचंदने वाईतून वस्तरा खरेदी केला. मांढरगडला आल्यावर पाण्याची बाटली घेतली.
परिसर फिरण्याच्या निमित्ताने भारतीला मंदिराच्या ईशान्येला असलेल्या दाट झाडीत नेले. त्याठिकाणी त्याने भारतीला कपडे काढण्यास सांगितले. मात्र, भारतीने आरडाओरडा करत आई-वडिलांना सांगण्याची धमकी दिली. मी त्यांना सांगितले, तर ते तुला मारतील,’ असे भारतीने म्हटल्यावर चिडून त्यांनी ‘मला मारण्यापूर्वीच तुला संपवतो,’ असे म्हणत देवीचंदने भारतीच्या गळ्यावर वस्तरा चालविला. खून केल्यानंतर मृतदेह तेथेच टाकून तो वाईला आला. गुन्ह्यात वापरलेला वस्तरा वाई येथील महागणपती मंदिराजवळील कृष्णा नदीत टाकला. त्यानंतर पाचवड येथून गाडी पकडून तो लाकडी (ता. इंदापूरला) गावी पळून गेला.
घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक रमेश गलांडे पथकासह घटनास्थळी गेले. तेथे पडलेली कॅरिबॅग व जीन्सवरून पिशवी खंडाळ्यातील दुकानातील असल्याचे समजले. संबंधित दुकानात फोन लावून दिवसभरात कोणी कपडे नेलेत का? याची माहिती घेतली. त्यांच्याकडून एका मुलीने कपडे खरेदी केल्याचे समजले. त्यावरून मृत भारती परिसरातील असल्याचा संशय आला. त्यानंतर गुराखी व मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. याप्रकरणी भारतीचे वर्णन सर्व पोलीस ठाण्यांना पाठविले. त्यावरून भुर्इंज पोलीस ठाण्यात कादर भोसलेने मुलगी भारती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्याचे समजले.
यावरून कादर भोसलेला पोलिसांनी बोलावून घेतले. यावेळी कादरने भारतीला ओळखले. भारतीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार देवीचंदला लाकडीतून ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Bloody and rustic river in the forest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.