अर्धनग्न मोर्चेकऱ्यांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:25 PM2019-01-20T23:25:12+5:302019-01-20T23:25:17+5:30

सातारा : खंडाळा तालुक्यातील केसुर्डीसह दहा गावांतील शेतकºयांनी काढलेला अर्धनग्न मोर्चा पोलिसांनी मानखुर्दमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता ...

Armed brothers take possession | अर्धनग्न मोर्चेकऱ्यांना घेतले ताब्यात

अर्धनग्न मोर्चेकऱ्यांना घेतले ताब्यात

Next

सातारा : खंडाळा तालुक्यातील केसुर्डीसह दहा गावांतील शेतकºयांनी काढलेला अर्धनग्न मोर्चा पोलिसांनी मानखुर्दमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण देत अकरा तास भर उन्हात अडवून ठेवला. संध्याकाळी सातच्या सुमारास मोर्चेकºयांचे सुरक्षतेचे कारण सांगत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत चेंबूर येथील साधू वासवानी हायस्कूलमध्ये रवानगी केली.
विशेष म्हणजे, मानखुर्दमध्ये मोर्चा अडवल्यानंतर एका आंदोलकाने पालकमंत्री विजय शिवतारे यांना दूरध्वनीद्वारे मदतीची याचना केली. तेव्हा शेतकºयांनी पाठविलेला आंदोलनाचा मेल मिळालाच नाही,’ असे सांगितले. याचाही जाहीर निषेध केला. याबाबतची पालकमंत्री व आंदोलकांमध्ये झालेल्या संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियावर दिवसभर फिरत होती.
खंडाळा तालुक्यातील एमआयडीसी टप्पा क्रं. १, २, ३ यामध्ये जमीन संपादन झालेल्या केसुर्डीसह दहा गावांतील शेतकºयांनी खंडाळा तहसील कार्यालय ते मंत्रालय असा अर्धनग्न मोर्चा काढला आहे. शेतकºयांना दोन दिवसांपासून शासनाच्या लालफितीचा फटका बसत आहे. मुंबईच्या वेशीवरच थांबवत कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे सांगत मोर्चा अडवण्यात आला. रविवारी तब्बल अकरा तास भर उन्हात शेतकरी बांधवांसहित महिलांनाही अडवण्यात आल्याने शेतकरी बांधवांची कुंचबणा झाली.
मानखुर्दमध्ये मोर्चा अडवल्यानंतर मोर्चेकºयांनी पोलिसांकडे केवळ मंत्रालयाकडे जाण्याकरिता मुंबईमधील नागरिकांना कोणताही त्रास न होता केवळ पाच फूट फूटपाथाची मागणी केली. प्रशासनाने मोर्चेकºयांना वरिष्ठ अधिकारी तथा मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या आदेशानुसार मानखुर्दपुढे जाता येणार नसल्याचे सांगण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी त्याचठिकाणी ठिय्या मांडला. पोलिसांनी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षतेचे कारण सांगत चेंबूर येथील साधु वासवानी हायस्कूल याठिकाणी पोलिसांच्या गाड्या तसेच आंदोलनकर्र्त्यांच्या बरोबर असलेल्या वाहनातून महिलांसहित रवानगी केली.

Web Title: Armed brothers take possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.