लिफ्ट दिल्यानंतर एअरगनचा धाक दाखवून शिक्षिकेला लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:57 AM2019-05-03T11:57:24+5:302019-05-03T11:58:32+5:30

कारमधून लिफ्ट दिल्यानंतर शिक्षिकेला एअरगनचा धाक दाखवत लूटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारचालकाच्या मुसक्या आवळण्यात शिरवळ पोलिसांना अवघ्या दोन तासांत यश आले. गणेश मधुकर नलावडे ( वय २३, रा. लऊळ ता. माढा जि. सोलापूर ) असे अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे.

After giving lift, try to rob the teacher by showing arrogance | लिफ्ट दिल्यानंतर एअरगनचा धाक दाखवून शिक्षिकेला लुटण्याचा प्रयत्न

लिफ्ट दिल्यानंतर एअरगनचा धाक दाखवून शिक्षिकेला लुटण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देकार चालकाला अटक : अवघ्या दोन तासांत गुन्ह्याचा छडाअज्ञाताने दागिन्यांसह रोखड लांबविली

शिरवळ : कारमधून लिफ्ट दिल्यानंतर शिक्षिकेला एअरगनचा धाक दाखवत लूटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारचालकाच्या मुसक्या आवळण्यात शिरवळ पोलिसांना अवघ्या दोन तासांत यश आले. गणेश मधुकर नलावडे ( वय २३, रा. लऊळ ता. माढा जि. सोलापूर ) असे अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वनवासवाडी, खेड सातारा येथील वैशाली भीमराव देवकुळे (वय ४२) या शिरवळ येथील एका विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. वैशाली देवकुळे या सातारा येथून शिरवळला रोज येत असतात. सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट येथून शिरवळ याठिकाणी जाण्यासाठी महामार्गावर त्या मुलासमवेत आल्या होत्या. त्या ठिकाणी आलेल्या एका कारमध्ये त्या बसल्या.

शिरवळजवळ कार आली असता चालकाने अचानकपणे बॅगेतील रिव्हॉल्वरसारख्या दिसणाऱ्या हत्याराचा धाक त्यांना दाखविला. वैशाली देवकुळे यांच्या हातातील पर्स हिसकावून साहित्य व पैसे चोरण्याचा प्रयत्न करत त्याने पाच हजार रुपयांची मागणी केली. यावेळी वैशाली देवकुळे यांनी आरडाओरडा केला असता कारचालकाने कार सारोळा पुलाच्या पुढे नेत गाडीचा वेग कमी केल्याने देवकुळे या पर्ससह गाडीतून खाली उतरल्या. त्यानंतर त्यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली.

पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी तत्काळ आरोपीच्या शोधासाठी पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, हवालदार आप्पा कोलवडकर, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड , प्रशांत वाघमारे यांच्या पथकाला रवाना केले. जेजुरी येथून कार चालक गणेश नलवडे आणि त्याच्या भावाला ताब्यात घेतले. अवघ्या दोन तासांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. नलवडेकडून एअरगण जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने कार चालक नलवडेला ३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


अज्ञाताने दागिन्यांसह रोखड लांबविली

शिरवळ : घर व प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे साडे अकरा तोळे वजनाचे दागिने व ५० हजारांची रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रंगजना दिनकर गोळे ( सध्या रा. मुंबई. मूळ रा. सांगवी ता. खंडाळा) या कुटुंबियांसमवेत सांगवी येथे ग्रामदैवताच्या यात्रसाठी आल्या होत्या. यात्रा उरकून शिरवळमधून पुण्याला जाण्यासाठी एसटीमध्ये बसल्या. पुण्यात मुलीच्या घरी गेल्यावर बॅगमध्ये पाहिले असता आतील ऐवज लंपास झाल्याचे दिसून आले.

अज्ञाताने मोहनमाळ, राणीहार, नेकलेस असे सोन्याचे साडेअकरा तोळे वजानाचे दागिने व ५० हजार रुपये रोख रक्कम नेली. त्यानंतर रंगजना गोळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे तपास करीत आहेत.

Web Title: After giving lift, try to rob the teacher by showing arrogance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.