तडीपारीच्या विक्रमानंतर आता मोक्कातही शतक : सातारा पोलिसांची डबल धमाका कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 10:46 PM2018-03-16T22:46:47+5:302018-03-16T22:47:28+5:30

सातारा : जिल्ह्यातील खून, दरोडा, सावकारी, खंडणी, जबरी चोरी, मटका-जुगार चालवणारे, बेकायदा दारूविक्री आदी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण

 After the breakdown of the crackdown, it is also a hundredth century: double explosion of Satara police | तडीपारीच्या विक्रमानंतर आता मोक्कातही शतक : सातारा पोलिसांची डबल धमाका कारवाई

तडीपारीच्या विक्रमानंतर आता मोक्कातही शतक : सातारा पोलिसांची डबल धमाका कारवाई

Next

सातारा : जिल्ह्यातील खून, दरोडा, सावकारी, खंडणी, जबरी चोरी, मटका-जुगार चालवणारे, बेकायदा दारूविक्री आदी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शंभरपेक्षा जास्त जणांना तडीपार केले. त्यानंतर आता १३ टोळ्यांमधील १०२ जणांवर मोक्का कारवाई करत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवार्इंची डबल सेंच्युरी पूर्ण केली आहे.

सातारा जिल्ह्यातील दहशत करून बेकायदा आर्थिक फायदा करणारे, बेकायदेशीर कृत्ये करणारे, अवैध खासगी सावकारी करणारे सराईत गुन्हेगार, मारामारी, खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या १३ टोळ्यांवर सर्व पोेलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यामार्फत मोक्काचे प्रस्ताव पाठवले होते. त्यास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी १३ प्रस्तावातील १०२ जणांना मोक्का कारवाईस मंजुरी दिली आहे.

यामध्ये २०१६ मध्ये जबरीचोरी गुन्हेगारांच्या १ टोळीमधील ६, २०१७ मध्ये दरोडा टाकून दहशत माजवून मारहाण करत जबरदस्तीने वसुली करणारे ९ टोळीतील ६७ आरोपींवर व २०१८ मध्ये ३ दरोडे टाकून खून करून जबरी चोरी, सावकारीच्या व्याजासाठी दहशत करून वाहने जबरदस्तीने चोरून घेऊन जाणाºया टोळ्यांमध्ये २९ आरोपींवर मोक्का लावण्यात आला. त्यामध्ये रॉयल ऊर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा, प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकर, महेंद्र तपासे, अमित ऊर्फ सोन्या देशमुख, आकाश ऊर्फ बाळू खुडे, शेखर गोरे, आशिष जाधव, अनिल कस्तुरे, चंद्रकांत ऊर्फ चंदर लोखंडे, अमित ऊर्फ बिºया कदम, रुकल्या दशरथ, बाळू ऊर्फ विनोद खंदारे यांच्या टोळीतील १०२ सदस्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

विश्वास नांगरे-पाटील व संदीप पाटील हे हजर झाल्यापासून जनतेतून सावकारी करणारे, खून, जबरीचोरी करणाºया लोकांवर जनतेमधून कारवाईची मागणी होत होती. त्यामुळे जिल्ह्यातून तडीपार करून शतक पूर्ण केल्यानंतर आतापर्यंत १०२ लोकांवर मोक्का अन्वये कारवाईचे शतक पूर्ण केले. येवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जिल्ह्यातील क्राईम रेट आला खाली
सातारा शहरासह जिल्ह्यात बेकायदा दारू, मटका चालवणारे, खासगी सावकारी करणाºया टोळ्या व्यापारी, वाहन चालक व महिलांना १० ते २० टक्के व्याज दराने पैसे देत होते. त्यांनी धमकावणे, मारहाण व अपहरण करत दहशतीने वाहने, जमिनी व घरे स्वत:च्या अगर इतरांच्या नावे करत कोट्यावधी रुपयांची संपत्ती गोळा केली होती. त्यामुळे जिल्ह्याचा क्राईम रेट वाढला होता. यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तडीपारी आणि मोक्काचे हत्यार उपसले. प्रतिबंधक कारवायांमुळे अनेकजणांना जेरबंद तर काही फरार झाल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया कमी झाल्या आहेत.

Web Title:  After the breakdown of the crackdown, it is also a hundredth century: double explosion of Satara police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.