महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकरांच्या कारला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 17:11 IST2018-02-21T16:29:52+5:302018-02-21T17:11:00+5:30

आदेश बांदेकर कारने कोल्हापुरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे

Aadesh Bandekar car met with an accident | महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकरांच्या कारला अपघात

महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकरांच्या कारला अपघात

सातारा - महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून प्रसिद्ध असणारे अभिनेते आदेश बांदेकर यांच्या कारला अपघात झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, कराड रोडवर हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आदेश बांदेकर कारने कोल्हापुरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. सुदैवाने आदेश बांदेकर या अपघातातून बचावले असून ते सुखरुप आहेत. 

आदेश बांदेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, सिद्धिविनायक मंदिराच्या वतीने एक कोटींचा धनादेश जिल्हाधिका-यांकडे सोपवण्यासाठी ते चालले होते. यावेळी टायर फुटल्यामुळे अपघात झाला आणि गाड्या एकमेकांवर आदळल्या. आदेश बांदेकर यावेळी त्यांच्या फॉर्च्यूनर गाडीने प्रवास करत होते. मात्र सीटबेल्ट लावला असल्या कारणाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नसून ते सुखरुप आहेत. आदेश बांदेकर हे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असून शिवसेना नेते आहेत. 

आदेश बांदेकर यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिराचे इतर विश्वस्तही होते. मात्र कोणालाही काही नुकसान झालं नसल्याची माहिती त्यांनी दिली. सिद्धिविनायकाच्या कृपेने आपण सुखरुप असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: Aadesh Bandekar car met with an accident