५ वर्षांत ‘एस’ वळणाचे ६५ बळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 05:18 IST2018-04-11T05:18:46+5:302018-04-11T05:18:46+5:30
पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर ‘एस’ वळणावर काळ आ वासून बसला आहे.

५ वर्षांत ‘एस’ वळणाचे ६५ बळी!
सातारा : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर ‘एस’ वळणावर काळ आ वासून बसला आहे. या वळणाने गेल्या पाच वर्षांत तब्बल ४७ बळी घेतले. मंगळवारी अठरा ठार झाले. त्यामुळे बळींचा आकडा ६५ वर गेला आहे.
विशेष म्हणजे या वळणावरील अपघातानंतर जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला; पण एकालाही अटक झालेली नाही. पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी राज्यमार्ग बनला आहे. अनेक सोयीसुविधा निर्माण झाल्या. प्रवासाचा वेळ वाचला. या मार्गातील काही वळणे अशास्त्रीय पद्धतीने बनले आहेत.