संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:24 AM2017-08-08T00:24:14+5:302017-08-08T00:24:17+5:30

Without the city of conflict, there will be no full debt waiver | संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही

संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
पलूस : सरकारची कर्जमाफी फसवी असून, आंदोलनाचा बडगा उगारल्याशिवाय सरकार जागे होणार नाही. कारण सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. त्यामुळे संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही, असे प्रतिपादन कॉम्रेड अशोक ढवळे यांनी केले.
कुंडल येथे पलूस तालुक्यातील समाजवादी प्रबोधिनी, परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते आणि जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या सहभागाने, क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीच्या औचित्याने खुले चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी ‘शेतकºयांची कर्जमाफी : मिळालं काय आणि मिळवायचं काय?’ या विषयावर कॉ. डॉ. ढवळे बोलत होते.
क्रांती उद्योग समूहाचे नेते अरुण लाड अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत व्ही. वाय. पाटील, जि. प. सदस्य शरद लाड, कॉ. उमेश देशमुख, जे. पी. लाड, कुंडलिक एडके, वसंतराव लाड, प्रा. बाबूराव लगारे, प्रा. सुनील काकडे, अ‍ॅड. सुधीर गावडे आदी प्रमुख उपस्थित होते.
कॉ. ढवळे म्हणाले की, सरकार आणि त्यांची ऐतिहासिक कर्जमाफी फसवी आहे. याविरुद्ध शेतकºयांनी संघटितपणे संघर्ष करण्याची गरज आहे. या तीन वर्षांत महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात मोठे संकट आकार घेत असल्याचा अंदाज नॅशनल क्राईम बिरो आॅफ रेकॉर्डने व्यक्त केला होता. जागतिकीकरणाच्या धोरणानंतर १९९२ पासून गेल्या पंचवीस वर्षांत देशातील साडेतीन लाख शेतकºयांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली. आयात-निर्यात धोरणाने बरबाद केले. महाराष्ट्रातील सत्तर हजार शेतकºयांनी कर्जाला कंटाळून जीवन संपवले. संपाच्या रूपाने प्रचंड चिडलेल्या, संतापलेल्या शेतकºयाला व्यक्त व्हायला वाट मिळाली.
अरुण लाड म्हणाले की, नोटाबंदीच्या निर्णयामुळे तीन हजार कोटीचे नुकसान झाले. दोन कोटी नोकºयांचे आश्वासन फसवे ठरले. आज जिल्ह्यातील ३५०० शेतकरी तरुणांचा विवाह होत नाही.
यावेळी प्राचार्य तानाजीराव चव्हाण, प्रा. रवींद्र येवले, म. मा. फाटक गुरुजी, बी. बी. खोत, मारुती शिरतोडे, कॉ. दीपक घाडगे, मारुती शिरतोडे आदी उपस्थित होते.
यावेळी चळवळीतील विशेष कार्याबद्दल कवी संदीप नाझरे, विशाल शिरतोडे, वैभव माळी, जमीर सनदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कॉ. अर्जुन जाधव यांनी स्वागत केले. आदम पठाण यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Without the city of conflict, there will be no full debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.