स्मार्ट सीटी ही सरकारची जुमलेबाजीची योजना : वंदना चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 03:18 PM2019-02-25T15:18:58+5:302019-02-25T15:21:21+5:30

स्मार्ट सिटी ही संपूर्ण शहराची नाही तर एका भागाची आहे. ही योजना या सरकारची जुमलेबाजीची योजना आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केले. सांगली येथे शहरी भागातील प्रश्नावर आयोजित सुसंवाद सभेत त्या बोलत होत्या.

Vandana Chavan, the government's motto for Smart Citi | स्मार्ट सीटी ही सरकारची जुमलेबाजीची योजना : वंदना चव्हाण

स्मार्ट सीटी ही सरकारची जुमलेबाजीची योजना : वंदना चव्हाण

Next
ठळक मुद्देस्मार्ट सीटी ही सरकारची जुमलेबाजीची योजना - वंदना चव्हाणसांगलीत शहरी भागातील प्रश्नावर सुसंवाद सभा

सांगली : स्मार्ट सिटी ही संपूर्ण शहराची नाही तर एका भागाची आहे. ही योजना या सरकारची जुमलेबाजीची योजना आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केले. सांगली येथे शहरी भागातील प्रश्नावर आयोजित सुसंवाद सभेत त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी कॉग्रेंस पक्ष हा सर्व धर्म समभाव असणारा पक्ष आहे. शेतकरी हा आपल्या दैनंदिन जीवनाचा कणा असल्याने आपण नेहमीच त्यांच्या सोबत उभे राहतो. परंतु त्याच प्रमाणे शहरी भागातील प्रश्नांवर आपण आवाज उठविला पाहिजे. लोक सर्व काही पाहत असतात. सत्तेत असण्या पेक्षा विरोधात असल्यावर लोकांची भूमिका स्पष्ट पद्धतीने मांडता येते. लोकांच्या प्रश्नांवर आपली भूमिका ही नेहमीच ठोकण्याची असली पाहिजे.

आयुक्त व प्रशासन काम करीत नसेल तर आंदोलन उभे करणे गरजेचे आहे. आपण जो पर्यंत शहरांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करीत नाही तो पर्यंत आपली ओळख निर्माण होणार नाही. नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड येथील सत्ता आपल्या पक्षाकडे असताना शहर विकसित झाली. सांगलीतील महावीर गार्डन हे देखील आपल्याच सत्ता काळात निर्माण झालेले एक उत्तम उदाहरण आहे. सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांचा सहभाग करून घेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग हा आपल्या उपक्रमात झाला पाहिजे. कायद्याने त्यांना महत्त्व प्राप्त करून दिले आहे.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, महिला अध्यक्षा छाया पाटील, नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील आदींची भाषणे झाली.

कार्यक्रमास अरुण लाड, बाळासाहेब पाटील, हणमंत देशमुख, विजयबापू पाटील, बाळासाहेब होनमोरे,कमलाकर पाटील, दादासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे, मैनुद्दीन बागवान, विनया पाठक, छायाताई पाटील, भरत देशमुख, स्नेहल माळी, सागर घोडके, अभिजीत हारगे, संजय तोडकर, व पक्षाचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Vandana Chavan, the government's motto for Smart Citi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.