गाईचे डोहाळे जेवण २०० महिलांच्या उपस्थितीत, बुर्लीमध्ये अनोखा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:02 PM2017-12-01T17:02:01+5:302017-12-01T17:10:13+5:30

बुर्ली (ता. पलूस) येथील शेतकरी प्रभाकर पाटील व महादेव पाटील यांनी आपल्या खिलार जातीच्या गाईचे डोहाळे जेवण घातले. यावेळी गावातील महिलांनी गाईची ओटी भरली. विशेष म्हणजे गाईच्या डोहाळे जेवणासाठी गावातील १५० ते २०० महिलांनी उपस्थिती लावली. प्रभाकर पाटील हे पोटच्या मुलीप्रमाणे आपल्या गाईचा सांभाळ करीत असून, त्यांनी गाईच्या डोहाळे जेवणात नऊ प्रकारच्या दुरड्या केल्या होत्या.

Unique type of burly, cows meal in the presence of 200 women | गाईचे डोहाळे जेवण २०० महिलांच्या उपस्थितीत, बुर्लीमध्ये अनोखा प्रकार

बुर्ली (ता. पलूस) येथील शेतकरी प्रभाकर पाटील व महादेव पाटील यांनी आपल्या खिलार जातीच्या गाईचे डोहाळे जेवण घातले. यावेळी गावातील महिलांनी गाईची ओटी भरली.

googlenewsNext
ठळक मुद्देदारात मंडप घालून सजविण्यात आले गाईला महिलांनी केले गाईचे पूजन, उत्स्फूर्त प्रतिसाद, विधिवत डोहाळे जेवण

सांगली : बुर्ली (ता. पलूस) येथील शेतकरी प्रभाकर पाटील व महादेव पाटील यांनी आपल्या खिलार जातीच्या गाईचे डोहाळे जेवण घातले. यावेळी गावातील महिलांनी गाईची ओटी भरली. विशेष म्हणजे गाईच्या डोहाळे जेवणासाठी गावातील १५० ते २०० महिलांनी उपस्थिती लावली.

प्रभाकर पाटील हे पोटच्या मुलीप्रमाणे आपल्या गाईचा सांभाळ करीत असून, या गाईचे डोहाळे जेवण घालून त्यांनी, प्राणीमात्रावर दया करा, त्यांना माणसाप्रमाणेच वागणूक द्या, अशी शिकवण दिली आहे. त्यांनी गाईच्या डोहाळे जेवणात नऊ प्रकारच्या दुरड्या केल्या होत्या.

त्यांनी बाजरीची भाकरी, धपाटी, पुरणपोळी, शंकरपाळी, लाडू, चकली, गाईला कापड नारळ, फळे आदी पदार्थ ठेवले होते. तसेच त्यांनी गावातील लोकांना शिरा, भात, भाजी, आमटीचे जेवण घातले.

दारात मंडप घालून गाईला सजविण्यात आले होते. ग्रामीण भागात फक्त महिलांचा ओटीभरण कार्यक्रम होतो. पण महिलांनी या गाईचे पूजन केले. त्यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विधिवत हे डोहाळे जेवण पार पडले.
 

Web Title: Unique type of burly, cows meal in the presence of 200 women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.