यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वाद्ये तेजीत : ढोल, झांज, बॅन्ड, बॅन्जोचे दर लाखापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 08:44 PM2018-08-23T20:44:33+5:302018-08-23T20:47:48+5:30

Traditional instruments in this year's Ganesh festival are fast: drum, cymbals, band, | यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वाद्ये तेजीत : ढोल, झांज, बॅन्ड, बॅन्जोचे दर लाखापर्यंत

यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वाद्ये तेजीत : ढोल, झांज, बॅन्ड, बॅन्जोचे दर लाखापर्यंत

googlenewsNext
ठळक मुद्देसार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांची बुकिंगसाठी धावपळ

सदानंद औंधे
मिरज : गणेशोत्सवासाठी बॅन्ड, बॅन्जो, झांजपथक, ढोलताशा, नाशिक ढोल, लेझीम, धनगरी ढोल, टाळ-मृदंग या पारंपरिक वाद्यांना मागणी आहे. बॅन्ड, बॅन्जो व झांज-ढोलताशा पथकांचे दर ५० हजारांपासून लाखापर्यंत पोहोचले आहेत.

गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीसाठी वाद्यपथकांना मोठी मागणी असल्याने बुकिंगसाठी सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. महापालिका निवडणूक नुकतीच पार पडल्याने गणेश मंडळे उत्साहात आहेत. यापूर्वी मोठ्या आवाजाच्या साऊंडसिस्टीमुळे पारंपरिक वाद्यांवर संक्रांत आली होती; मात्र गेल्या काही वर्षांत पोलिसांकडून या मोठ्या आवाजाच्या साऊंडसिस्टीमच्या बंदीच्या कठोर अंमलबजावणीमुळे व कारवाईमुळे गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत.

नवव्या व अखेरच्यादिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बॅन्ड, बॅन्जो, झांज, ढोलपथक मिळविणे अवघड झाले आहे. यावर्षी विसर्जनाच्या अखेरच्यादिवशी मोठी मागणी असल्याने बॅन्ड, बॅन्जो, झांजपथकाचे, ढोलताशा पथकाचे दर ५० हजारांपासून लाखापर्यंत पोहोचले आहेत. बॅन्जो व झांजपथके ताशी दहा ते पंधरा हजारांची मागणी करीत आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बॅॅन्जो व झांजपथके आहेत. मिरजेसह कागवाड, सौदत्ती, चिकोडी, जमखंडी, अथणी येथील बॅन्ड पथकांचा लौकिक आहे. केरळी चंडीनृत्य, नाशिक ढोल हा सनईच्या साथीने ढोलवादन व एकाचवेळी ६० ते ७० वादकांचे ढोलताशा वादन मिरवणुकीचे आकर्षण ठरत आहे. नाशिक ढोलसाठी किमान ३० हजार, तर ढोलताशा पथकासाठी लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

गणेशोत्सवात मागणी असल्याने वाद्यपथकांची चांगली कमाई होणार आहे. अनेक मंडळांनी महापालिका निवडणुकीदरम्यान गणेशोत्सवापूर्वी महिनाभर अगोदर वाद्यपथके ठरविली आहेत. स्थानिक वाद्यपथकांची टंचाई असल्याने कर्नाटकातील वाद्यपथकांना पाचारण करण्यात येत आहे. आर्थिक क्षमता कमी असलेल्या मंडळांची धनगरी ढोल, लेझीम, टाळ-मृदंग या किमान १५ ते २० हजार रुपये दर असलेल्या स्वस्त वाद्यांना पसंती आहे.

मिरजेत मुली व महिलांची ढोलताशा पथके, मुला-मुलींच्या ढोलताशा पथकांचा गेल्या महिन्याभरापासून गणेशोत्सवासाठी सराव 

ढोल व ताशाची जुगलबंदी असलेल्या ढोलताशा पथकांना मोठी मागणी असल्याने सांगली, मिरजेत स्थानिक वादकांच्या अनेक ढोलताशा पथकांची निर्मिती झाली आहे. गणेशोत्सवात झांजपथक व बॅन्ड व बॅन्जोसाठी ५० हजार ते लाखापर्यंत दर आहेत. ५० ते ७० वादक असलेल्या ढोलताशा पथकांसाठी ताशी २५ हजार रुपये दर आहे. वादकांच्या संख्येवर ढोलताशा पथकाचा दर आहे. एकाचवेळी शेकडो ढोल वाजविणारी ढोलताशा पथके आवाजाबाबत डॉल्बीशी स्पर्धा करतात.

Web Title: Traditional instruments in this year's Ganesh festival are fast: drum, cymbals, band,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.