शांतिनिकेतनचा कर्मयोगी पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 09:37 PM2017-12-31T21:37:45+5:302017-12-31T21:37:45+5:30

प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील सोशल फोरम, शांतिनिकेतन सांगलीच्यावतीने देण्यात येणारा ‘कर्मयोगी’ पुरस्कार यंदा ‘रयत शिक्षण संस्थे’ला प्रदान करण्यात येणार आहे.

Shantiniketan's Karmayogi Award to the Rit Shikshan Sanstha | शांतिनिकेतनचा कर्मयोगी पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला जाहीर

शांतिनिकेतनचा कर्मयोगी पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला जाहीर

googlenewsNext

सांगली : प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील सोशल फोरम, शांतिनिकेतन सांगलीच्यावतीने देण्यात येणारा ‘कर्मयोगी’ पुरस्कार यंदा ‘रयत शिक्षण संस्थे’ला प्रदान करण्यात येणार आहे. रविवार १४ जानेवारी रोजी शांतिनिकेतन लोकविद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी संस्थेच्या बिसूर हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तानाजी पाटील व कलाविश्व महाविद्यालयाचे सेवानिवृत्त वरीष्ठ लिपीक शामराव जगताप यांना ‘माई’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ही माहिती फोरमचे सचिव बी. आर. थोरात यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले की, समाजाच्या विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाºया त्याचप्रभाणे या क्षेत्रात नवनवे प्रयोग करुन समाजाला नवी दिशा देणाºया, समाजातील गोरगरीब, कष्टकरी बहुजन समाज स्वावलंबी आणि स्वाभिमानी व्हावा यासाठी कार्यरत राहिलेल्या ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी फोरम कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून निरपेक्षपणे कार्य करणाºया संस्थेस, कार्यकर्त्यास  प्रतिवर्षी ‘कर्मयोगी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला जाहिर करण्यात आला आहे. संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल आप्पासाहेब पाटील हे सन्मान स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमास माजी अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल आॅफ पोलिस, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य भगवानराव मोरे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षस्थानी फोरमचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आहेत, 
कर्मवीरअण्णांची रयत शिक्षण संस्था आज शतक महोत्सव साजरा करीत आहे. डॉ. अनिल पाटील यांनी चेअरमन पदाची सुत्रे घेतल्यानंतर ही संस्था ग्लोबल व्हायला सुरवात झाली. शिक्षणाबाबत नवी नजर आणि ध्येय असलेले डॉ. पाटील यांनी रयतचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कर्मयोगी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कर्मवीरअण्णांचा वारसा जपत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.पी. बी. पाटील यांनीही शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.  ही व्यवस्था कारकून तयार करणारी नसून माणसाला माणून घडविणारी आहे, हा विचार कर्मवीरअण्णांचा होता. तोच विचार घेऊन डॉ. पी. बी. पाटील व त्यांच्यानंतर संचालक गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनची वाटचाल सुरू असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

Web Title: Shantiniketan's Karmayogi Award to the Rit Shikshan Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.