सांगली : भूमी कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकास अटक, पाच दिवसांची पोलिस कोठडी; कार्यालयात चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 02:45 PM2017-12-24T14:45:06+5:302017-12-24T14:45:48+5:30

ठेवीदारांना गंडा घालणारे भूमी प्रॉपकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रकल्प व्यवस्थापक विनोद सुखदेव कदम (वय ३०, रा. इनाम धामणी, ता. मिरज) यास अटक करण्यात विश्रामबाग पोलिसांना शुक्रवारी रात्री उशिरा यश आले. तो घरी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी इनाम धामणीत छापा टाकून त्यास पकडले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भूमीच्या कार्यालयातील कर्मचाºयांकडे चौकशीचा ससेमीरा लागला आहे.

Sangli: Land manager of the company arrested, five days police custody; Inquiries at the office | सांगली : भूमी कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकास अटक, पाच दिवसांची पोलिस कोठडी; कार्यालयात चौकशी

सांगली : भूमी कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकास अटक, पाच दिवसांची पोलिस कोठडी; कार्यालयात चौकशी

Next

सांगली : ठेवीदारांना गंडा घालणारे भूमी प्रॉपकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रकल्प व्यवस्थापक विनोद सुखदेव कदम (वय ३०, रा. इनाम धामणी, ता. मिरज) यास अटक करण्यात विश्रामबाग पोलिसांना शुक्रवारी रात्री उशिरा यश आले. तो घरी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी इनाम धामणीत छापा टाकून त्यास पकडले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भूमीच्या कार्यालयातील कर्मचाºयांकडे चौकशीचा ससेमीरा लागला आहे.
कर्मवीर चौकात सिद्धिविनायक लॅन्डमार्क या टोलेजंग इमारतीच्या तिस-या मजल्यावर भूमीचे कार्यालय आहे. ठेवीची रक्कम गुंतविल्यास त्याच्या व्याजातून प्लॉट घेऊन देणार, महिना बचत ठेव अशा योजना काढून कंपनीने लोकांना पैसे भरण्यास भाग पाडले. इनाम धामणीच्या सुशीला पाटील यांनी स्वत:च्या तसेच सुनेच्या नावावर प्रत्येकी पाच लाख अशी एकूण दहा लाखांची रक्कम २८ मे २०१४ रोजी गुंतविली होती. पण पण प्रत्यक्षात त्यांना प्लॉट मिळाला नाही. तसेच ठेवीची रक्कमही दिली नाही. ठेवीची रक्कम परत मिळविण्यासाठी सुशीला पाटील यांनी भूमीच्या पाय-या झिजविल्या. तरीही त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे पाटील यांनी गेल्या आठवड्यात फिर्याद दाखल केली आहे. 
गुन्हा दाखल होऊन आठवडा होत आला तरी, पोलिसांनी संशयित मनोज कदम व अन्य संचालकांना अटक केली नाही. मनोज कदम हा मुख्य संशयित आहे, तर अटक केलेला विनोद कदम हा त्याचा सख्खा भाऊ आहे. दोघेही गावात खुलेआम फिरत असताना पोलिस त्यांना अटक करीत नसल्याचा आरोप फिर्यादी सुशील पाटील कुटुंबाने शुक्रवारी केला होता. यासंदर्भात त्यांनी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांची भेट घेऊन पोलिस तपास संथगतीने सुरु असल्याची तक्रार केली होती. बोराटे यांनी विश्रामबाग पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर संशयितांचा शोध सुरु ठेवला. रात्री उशिरा विनोद कदम यास अटक केली. 
कर्मचा-यांकडे चौकशीचा ससेमीरा
मुख्य संशयित मनोज कदम हा गुन्हा दाखल होताच पसार झाला आहे. त्याचे कार्यालय मात्र अजूनही सुरु आहे. ठेवीदार पैसे काढण्यासाठी हेलपाटे मारत आहेत. मनोज कदम हा कर्मचाºयांच्या संपर्कात आहे. कर्मचाºयांकडून तो कार्यालयातील स्थितीची माहिती घेत आहे. तसेच कार्यालयात एक कर्मचारी आतील खोलीत बसलेला असतो. तोही अधून-मधून बाहेर येऊन कोण-कोण येऊन जाते, हे पाहतो.

Web Title: Sangli: Land manager of the company arrested, five days police custody; Inquiries at the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.