3 लाखांच्या सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढीसाठी सांगलीत लागल्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 07:22 PM2018-05-16T19:22:06+5:302018-05-16T19:22:06+5:30

सलून व्यवसायिकाची शक्कल

Range of Sangli rows for a beard with a gold jewelery of 3 lakhs | 3 लाखांच्या सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढीसाठी सांगलीत लागल्या रांगा

3 लाखांच्या सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढीसाठी सांगलीत लागल्या रांगा

googlenewsNext

सांगली : आपल्या व्यवसायात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यवसायिकांकडून अनेक क्ल्पूत्या लढविल्या जातात. कधी वस्तूंवर एखादी वस्तू फ्री तर आणखी काही मात्र, सांगलीच्या एका सलून व्यवसायिकाने सोन्याच्या वस्ताºयाने दाढीची शक्कल लढविली आहे. त्यासाठी त्याने साडे दहा तोळ्यांचा वस्तारा तयार करून घेतला असून या वस्ता-याने दाढी करून घेण्यासाठी सांगलीकरांमध्ये नवी ‘क्रेझ’ निर्माण झाली आहे. गावभाग येथील रामचंद्र दत्तात्रय काशीद असे सलून व्यवसायिकाचे नाव असून या वस्ता-याने दाढी करून घेण्यासाठी गर्दी होत आहे.

सांगलीतील गावभाग परिसरातील उस्त्रा मेन्स स्टुडिओ हे रामचंद्र काशीद यांचे सलून दुकान. काहीतरी वेगळे आणि भव्यदिव्य करण्याची इच्छा असलेल्या काशीद यांनी ३ लाख रूपये खर्चून साडे दहा तोळ्यांचा वस्तारा तयार करून घेतला आहे. रामचंद्र यांचे वडील दत्तात्रय यांच्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांचीच या सोन्याच्या वस्ता-याने दाढी करून त्यांनी याची सुरूवात केली आहे.

हा आगळावेगळा वस्तारा तयार करण्यासाठी सांगलीतील कोणीच सुवर्ण कारागीर तयार झाला नाही. अखेर येथील चंदूकाका सराफ पेढीने हे आव्हान स्विकारून अवघ्या वीस दिवसात वस्तारा तयार करून दिला आहे.

Web Title: Range of Sangli rows for a beard with a gold jewelery of 3 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.