महापौर समस्या घेऊन येतच नाहीत, तर निधी कसा देणार?--सुभाष देशमुख यांची काँग्रेसवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 08:08 PM2017-09-15T20:08:58+5:302017-09-15T20:11:00+5:30

सांगली : आम्ही पक्ष, राजकारण बाजूला ठेवून राज्याचा आणि प्रत्येक जिल्'ाचा विकास होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत.

If the Mayor does not come to the problem, how can he fund? - Subhash Deshmukh criticized Congress | महापौर समस्या घेऊन येतच नाहीत, तर निधी कसा देणार?--सुभाष देशमुख यांची काँग्रेसवर टीका

महापौर समस्या घेऊन येतच नाहीत, तर निधी कसा देणार?--सुभाष देशमुख यांची काँग्रेसवर टीका

Next
ठळक मुद्दे निधी अडविणे ही भाजपची संस्कृती नाहीआमचे आमदार काम करतात अडचणी त्यांनी सांगितल्याच नाहीत, तर त्यांचे प्रश्न मला कसे कळतील?, खीळ घालण्याचा प्रयत्न;

सांगली : आम्ही पक्ष, राजकारण बाजूला ठेवून राज्याचा आणि प्रत्येक जिल्'ाचा विकास होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत. मी पालकमंत्री झाल्यापासून एकदाही सांगलीचे महापौर विकास कामे घेऊन माझ्याकडे आले नाहीत. तर त्यांना निधी कुठून मिळणार, असा सवाल पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला. उलट भाजपचे आमदार शहरात कामे करीत असताना, त्यांनाही खीळ घालण्याचे काम महापालिकेतील सत्ताधारी करीत आहेत, अशी टीका त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर केली. निधी अडविणे ही भाजपची संस्कृती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सांगलीत शुक्रवारी आढावा बैठक झाल्यानंतर पालकमंत्री देशमुख पत्रकारांशी बोलत होते. सांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रातील विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न विचारला असता, देशमुख म्हणाले की, सांगली, मिरज शहराच्या विकासाकडे कधीच आम्ही दुर्लक्ष केले नाही. विकास कामात राजकारण आणण्याची भाजपची रणनीतीच नाही. मी सांगलीचा पालकमंत्री झाल्यापासून एकदाही महापालिकेचे महापौर, पदाधिकारी विकास कामे घेऊन माझ्याकडे आले नाहीत. मी तर शहराचा विकास करण्यासाठी अनेक योजनांचे नियोजन करत आहे. शहरातील समस्या घेऊन महापौर माझ्याकडे आले, तर निश्चितच ती विकास कामे मार्गी लावण्यात येतील. महापौरांनाच शहरातील प्रश्न सोडवायचे नसतील, तर आम्ही त्याला काय करणार?, असा टोलाही देशमुख यांनी महापालिकेतील सत्ताधाºयांना लगावला.

ते म्हणाले की, विकास कामासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे निधीची कोणतीही अडचण नाही. सांगली शहरात आमदार सुधीर गाडगीळ, मिरज शहरात आमदार सुरेश खाडे विकास कामे घेऊन शासनाकडे जातात. त्यासाठी लागणारा निधी खेचून आणतात. पण, याला महापालिकेतील सत्ताधाºयांकडून हवे तेवढे सहकार्य मिळत नसल्याची टीकाही देशमुख यांनी केली.

दिवाळीपूर्वी शेतकºयांना कर्जमाफीचे पैसे मिळणार
कर्जमाफीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी आम्ही पुन्हा कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर आठ ते दहा दिवसात अर्जांची छाननी आणि सोशल आॅडिट करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठी महसूल, सहकार विभागाच्या अधिकाºयांना रात्रीचा दिवस करून कामे पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आॅक्टोबर महिन्यात कर्जमाफीचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर वर्ग होतील, असा विश्वासही सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.

उद्योग वाढीला उद्योजकांचेही प्रयत्न हवेत
सांगलीचा औद्योगिक विकास वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. पण, यासाठी उद्योजकांनीही काही प्रमाणात पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यांच्या समस्या, नवीन प्रकल्प याबाबत सूचना आणि प्रस्ताव देण्याची गरज आहे. मीही उद्योजक आहे. पण, सांगलीचा पालकमंत्री झाल्यापासून एकदाही उद्योजक माझ्याकडे त्यांच्या समस्या घेऊन आले नाहीत. त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्याच नाहीत, तर त्यांचे प्रश्न मला कसे कळतील?, असा टोलाही सुभाष देशमुख यांनी उद्योजकांच्या शिष्टमंडळाला लगावला.

 

Web Title: If the Mayor does not come to the problem, how can he fund? - Subhash Deshmukh criticized Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.