किती जणांचीही आघाडी करा, सत्ता आमचीच : रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 06:53 PM2019-02-28T18:53:47+5:302019-02-28T18:53:58+5:30

भाजपला पराभूत करण्यासाठी अनेक पक्ष, संघटना एकमेकांचे विचार पटत नसतानाही आघाडी करू पहात आहेत.

How many people should take the lead, you are ours: Raosaheb Danwe | किती जणांचीही आघाडी करा, सत्ता आमचीच : रावसाहेब दानवे

किती जणांचीही आघाडी करा, सत्ता आमचीच : रावसाहेब दानवे

Next

सांगली : पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर आले तर पुढील पन्नास वर्षे ते सत्तेवरून हलणार नाही, याची खात्री झाल्याने भाजपला पराभूत करण्यासाठी अनेक पक्ष, संघटना एकमेकांचे विचार पटत नसतानाही आघाडी करू पहात आहेत. कितीजणही एकत्र आले तरी भाजपचीच सत्ता केंद्रात व राज्यात येणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी येथे केला. सांगलीत कर्नाळ रस्त्यावर एका मंगल कार्यालयात भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, आ. सुरेश हाळवणकर, माजी आमदार दिनकर पाटील, रमेश शेंडगे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, रवी अनासपुरे आदी उपस्थित होते.

दानवे म्हणाले की, निवडणुका आल्या की आघाड्या होत असतात, मात्र ज्यांचे वैचारिक मतभेद होते ते लोकही आता एकत्र येत आहेत. कधीकाळी महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षाही खालच्या क्रमांकावर असणारा भाजप आता राज्यातील अव्वल पक्ष ठरला आहे. राज्यातील १0 हजार सरपंच, १८ महापालिका, ९0 नगरपालिका, १0 जिल्हा परिषदा आणि २३ खासदारांसह आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. वाढत जाणारी ही पक्षाची ताकद पाहूनच विरोधी गटात अस्वस्थता आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपला रोखले नाही, तर पुढील पन्नास वर्षे कोणत्याही अन्य पक्षाला सत्तेत येण्याची संधी मिळणार नाही, याची सर्वांना खात्री आहे.

सरकारचे हे यश चांगल्या धोरणांमुळे मिळत आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कॉंग्रेसच्या सत्ताकाळात कधीही गरिबांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर योजना राबविल्या नव्हत्या. राज्यात भाजपने ज्या योजना जाहीर केल्या, त्याची अंमलबजावणीही प्रभावीपणे केली. गरिबांच्या कल्याणाचा आमचा अजेंडा यापुढेही कायम राहणार आहे. भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रीतपणे शासनाच्या योजना आणि त्याचा लाभ कसा दिला गेला, याची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात अचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता अविश्रांत काम केले पाहिजे. येत्या ३ मार्च रोजी राज्यात सर्वत्र भाजपची मोटारसायकल रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. या रॅलीतून जोरदार शक्तीप्रदर्शन स्थानिक लोकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक
धनगर आरक्षणासंदर्भात नियुक्त संस्थेचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अधिवेशनात यासंदर्भात केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय होणार होता, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे अधिवेशन स्थगित करावे लागले. धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पावले टाकत आहे.

Web Title: How many people should take the lead, you are ours: Raosaheb Danwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.