आर्थिक वादातून सांगलीत भरदिवसा व्यापाऱ्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 02:42 PM2018-12-06T14:42:31+5:302018-12-06T14:47:11+5:30

आर्थिक वादातून डोर्ली (ता. तासगाव) येथील प्रशांत सूर्यकांत पाटील (वय ४०) या व्यापाऱ्यांचा लोखंडी सळईने हल्ला करुन निर्घृण खून करण्यात आला.

Feminist businessman murdered in Sangli | आर्थिक वादातून सांगलीत भरदिवसा व्यापाऱ्याचा खून

मयत प्रशांत पाटील

Next
ठळक मुद्देआर्थिक वादातून सांगलीत भरदिवसा व्यापाऱ्याचा खूनपत्नील कोंडले; संशयित रिक्षा चालक पसार

सांगली : आर्थिक वादातून डोर्ली (ता. तासगाव) येथील प्रशांत सूर्यकांत पाटील (वय ४०) या व्यापाऱ्यांचा लोखंडी सळईने हल्ला करुन निर्घृण खून करण्यात आला.

विश्रामबाग येथे शंभरफूटी रस्त्यालगत फेडरल बँकेजवळ साई सदन अपार्टमेंटमध्ये गुरुवारी भरदिवसा ही घटना घडली. घटनेनंतर संशयित हल्लेखोर सरफराज ताजुद्दीन निपाणी (३२, रा. छत्रीबाग रस्ता, पाण्याच्या टाकीजवळ, जत) हा पसार झाला आहे. तो रिक्षा चालक आहे.


संशयित हल्लेखोर

सूर्यकांत पाटील यांचे मार्केट यार्डमध्ये लक्ष्मीकांत टेडींग कंपनी या नावाने सरकी पेंड विक्रीचे दुकान आहे. विश्रामबाग येथे गणपती मंदिरजवळ त्यांचा बंगला आहे. साई सादन अर्पामेंटमध्ये फ्लॅट क्रमांक पाच हा त्यांच्या स्वत:च्या मालकीचा आहे.

दोन वर्षापूर्वी त्यांनी हा फ्लॅट संशयित ताजुद्दीन निपाणी यास भाड्याने दिला होता. निपाणी हा सांगली-मिरज रस्त्यावर रिक्षा व्यवसाय करतो. वर्षापूर्वी त्याने पाटील यांच्याकडून कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये उसणे घेतले होते.

ही रक्कम दोन महिन्यात त्याने देतो, असे सांगितले होते. पण त्याने रक्कम परत केली नाही. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरु होते. शुक्रवार पाटील रक्कम वसूलीसाठी गेले होते. त्यावेळी निपाणी याने लोखंडी सळईने हल्ला करुन त्यांचा खून केला.

Web Title: Feminist businessman murdered in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.