आमदारांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी -शामरावनगरप्रश्नी नाराजी : लागेल तेवढा मुरुम टाकण्याचे आदेश,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:55 PM2018-06-04T23:55:19+5:302018-06-04T23:55:19+5:30

Embarrassment of the officers from the tribunal- Shamrao Nagar Question: Angered: | आमदारांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी -शामरावनगरप्रश्नी नाराजी : लागेल तेवढा मुरुम टाकण्याचे आदेश,

आमदारांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी -शामरावनगरप्रश्नी नाराजी : लागेल तेवढा मुरुम टाकण्याचे आदेश,

Next
ठळक मुद्देगुडघाभर चिखलातून पायपीट

सांगली : दलदलीत रुतलेल्या सांगलीच्या शामरावनगर परिसरास सोमवारी आ. सुधीर गाडगीळ यांनी भेट देऊन रस्तेकामाची पाहणी केली. गैरसोयी पाहून आमदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची कानउघाडणी केली. लागेल तेवढा मुरुम या भागात टाकून सपाटीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

सर्वत्र दलदल आणि सांडपाण्याचे अस्तित्व असलेल्या शामरावनगरमधील नागरिकांनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. पालकमंत्र्यांसमोरही याविषयी गाºहाणे मांडले होते. याची दखल घेत आमदार गाडगीळ, अभियंता ए. ए. क्षीरसागर, माजी उपमहापौर शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह भाजपचे काही कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी सोमवारी शामरावनगरला भेट दिली. अरिहंत कॉलनी, महसूल कॉलनी, सुंदर कॉलनी, विठ्ठलनगर, अष्टविनायक कॉलनी, समता कॉलनीचे सर्वच रस्ते, अंतर्गत बोळ याठिकाणची त्यांनी पाहणी केली. गुडघाभर चिखल, रस्त्यापासून फूटभर उंचीवर असलेले ड्रेनेज, सांडपाण्याचे तलाव असे चित्र त्यांना पाहावयास मिळाले.

वर्षानुवर्षे येथे राहून अशाप्रकारची दुरवस्था तुम्ही लोक कशी सहन करता? याठिकाणच्या नगरसेवकांना चार-चारवेळा कसे निवडून देता, असे सवाल गाडगीळ यांनी नागरिकांसमोर उपस्थित केले. गाडगीळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भाऊसाहेब साळुंखे यांना फोन लावला. ‘तुम्ही एसीमध्ये बसून अधिकारशाही गाजवा, लोक येथे मला जाब विचारत आहेत’ असे सुनावले. साळुंखे शामरावनगरात धावत आले. त्यांनी मुरुमीकरणाची कामे सुरू असल्याचा खुलासा करताच गाडगीळ भडकले. काम कुठे सुरू आहे दाखवा, अशा पद्धतीने कधी मुरुम पडणार, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. माणसे वाढवा, ठेकेदार वाढवा. लागेल तेवढा मुरुम मी भाजपच्यावतीने देतो. पण गल्ली-बोळात मुरुमीकरण करा. पावसाळ्यात लोकांना घराबाहेर पडताना त्रास होता कामा नये, असेही त्यांनी आदेश दिले.

अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या असून, सांडपाणी निचºयाची व्यवस्था नसल्याबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या. यावर गाडगीळ यांनी आयुक्त रवींद्र खेबूडकर, पाणीपुरवठा अभियंता शीतल उपाध्ये यांना फैलावर घेतले. रस्ते मुरुमीकरणापूर्वी तात्काळ गळती काढा, नागरिकांना गळतीमुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे याबद्दल लक्ष द्या, असेही बजावले. यासाठी चार-सहा माणसे कायमस्वरूपी तैनात करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शरद नलावडे, संदीप दळवी, अमर पडळकर, रज्जाक नाईक, युवा नेते सुयोग सुतार, सुब्राव मद्रासी, सुधाकर पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

त्यांना निवडून का देता?
शामरावनगरमधील नागरिकांना किती वर्षांपासून राहता, असा सवाल गाडगीळांनी केल्यावर काहींनी १५ ते २० वर्षे, तर काहींनी ४० वर्षे रहात असल्याचे आणि हालअपेष्टा सहन करीत असल्याचे सांगितले. यावर गाडगीळ म्हणाले, एवढी वर्षे राहून तुम्ही हा अन्याय सहन का करीत आहात. वारंवार त्याच नगरसेवकांना तुम्ही निवडून का देता, असे सवाल केले. नागरिकांनीही प्रत्युत्तर देत यावेळी त्यांचा हिशेब करू, असे स्पष्ट केले.
 

शामरावनगरमध्ये पुन्हा दलदल!
वर्षानुवर्षे दलदलीत रुतलेल्या शामरावनगरात पुन्हा दोन दिवस झालेल्या पावसाने दयनीय अवस्था झाली आहे. ड्रेनेजमुळे गल्ली-बोळच काय, मुख्य रस्तेसुद्धा गुडघाभर चिखलात रुतले आहेत. नागरिकांना शंभर फुटीपासूनच राडेराड होऊन घराकडे ये-जा करावी लागते. वाहने रस्त्याकडेलाच लावावी लागतात. याबाबत अनेकवेळा सर्वपक्षीय कृती समिती, नागरिकांनी आंदोलने करूनही महापालिकेमार्फत उपाययोजना झाल्या नाहीत.

Web Title: Embarrassment of the officers from the tribunal- Shamrao Nagar Question: Angered:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.