‘ड्रॅगन फ्रूट’चे सांगली जिल्ह्यात ४०० टनाचे उत्पादन : मागणी अभावी दर गडगडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 10:26 PM2018-08-24T22:26:12+5:302018-08-24T22:30:34+5:30

ड्रॅगन फ्रूट या फळाच्या लागवडीखाली जिल्ह्यात सव्वाशे एकरहून अधिक क्षेत्र आले आहे. यंदा फळाचा दुसरा हंगाम सुरू असून ४०० टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. उत्पादन वाढल्यामुळे दर घसरला असून, तो किलोला ५० ते ११० रुपये मिळत

'Dragon Fruit' produces 400 tonnes in Sangli district: the demand for the demand is inadequate | ‘ड्रॅगन फ्रूट’चे सांगली जिल्ह्यात ४०० टनाचे उत्पादन : मागणी अभावी दर गडगडला

‘ड्रॅगन फ्रूट’चे सांगली जिल्ह्यात ४०० टनाचे उत्पादन : मागणी अभावी दर गडगडला

Next
ठळक मुद्दे५० ते ११० रुपये किलो दराने विक्री

अशोक डोंबाळे
सांगली : ड्रॅगन फ्रूट या फळाच्या लागवडीखाली जिल्ह्यात सव्वाशे एकरहून अधिक क्षेत्र आले आहे. यंदा फळाचा दुसरा हंगाम सुरू असून ४०० टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. उत्पादन वाढल्यामुळे दर घसरला असून, तो किलोला ५० ते ११० रुपये मिळत आहे.

निसर्गाचा लहरीपणा आणि सततच्या दुष्काळामुळे डाळिंब, द्राक्षबागायतदारांना नेहमीच आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. तेल्या रोगामुळे डाळिंब बागा आणि शेतकरीही उद्ध्वस्त झाला आहे. मात्र येथील येरळा प्रोजेक्ट संस्थेने ड्रॅगन फ्रूटचा पर्याय सर्वप्रथम २०१५ मध्ये जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपुढे ठेवला. पहिल्यावर्षी जिल्ह्यातील मोजक्यात शेतकºयांनी चाळीस एकरावर ड्रॅगन फ्रूटची शेती केली. या शेतकऱ्यांच्या पदरात पहिले पीक २०१७ मध्ये पडले. त्याचे उत्पन्न ७० टन होते. दुष्काळी भागातील ड्रॅगन फ्रूटची चव ग्राहकांच्या गळी उतरल्यामुळे त्यांच्याकडून मागणीही तेवढीच वाढली. दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत दर मिळाला. डाळिंब शेतीला पर्याय म्हणून ड्रॅगन फ्रूटकडे शेतकरी वळण्यास सुरुवात झाल्याचे जिल्ह्यातील वाढत्या क्षेत्रावरून दिसत आहे. जत तालुक्यातून ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीला सुरुवात झाली असली तरी, सध्या तासगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यापर्यंत त्याचा विस्तार झाला आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात यावर्षी १२५ एकरावर ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र आहे. ४०० टन उत्पादन यावर्षी मिळणार आहे. उत्पादन वाढल्यामुळे ड्रॅगन फ्रूटचे दर यावर्षी कमी झाले आहेत. सरासरी १०० ते २०० रुपये किलोला मिळणारा दर सध्या ५० ते ११० रुपयांवर आला असल्याचे शेतकºयांचे मत आहे. सांगलीच्या विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये रोज दीड ते दोन टन ड्रॅगन फ्रूटची आवक असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. आवक वाढल्यामुळे दर उतरल्याचे व्यापारी सांगत आहेत.
एकदाच गुंतवणूक, नंतर अत्यल्प पाणी आणि देखभाल खर्चात हे पीक भरघोस नफा देते. पुण्या-मुंबईसह बेंगळुरूच्या बाजारपेठेत प्रतिकिलो १०० ते १५० रुपये भाव मिळतो. हा दर अगदी चाळीस रुपये किलोप्रमाणे मिळाला तरी, उसापेक्षा जादा उत्पन्न मिळत असल्याचा दावा येरळा संस्थेचे सचिव नारायण देशपांडे यांनी केला आहे.

सरकारने निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावे : जयकर साळुंखे
दीड वर्षातील लागवडीबद्दलचा अनुभव नोंदवताना कमळापूर (ता. खानापूर) येथील जयकर साळुंखे म्हणाले की, ड्रॅगन फ्रूट लागवडीस एकरासाठी पहिल्या वर्षी तीन ते चार लाखांची गुंतवणूक करावी लागली. मात्र दुसºया वर्षी ६० ते ७० हजार रुपये मनुष्यबळास खर्च आला. औषधे, खतासाठीचा किरकोळ खर्च येतो. नर्सरीतूनही चांगला नफा मिळवला. उत्पादन वाढल्यामुळे दर उतरले आहेत. ड्रॅगन फ्रूटची शेती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

ड्रॅगन फ्रूट शेती दुष्काळग्रस्तांसाठी उत्तम पर्याय : नारायण देशपांडे
पहिल्या वर्षी ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी एकरी तीन ते चार लाख रुपयांचा खर्च येतो. त्यानंतर ४० ते ५० हजार रुपयेच उत्पादन खर्च येतो. पहिल्या वर्षी एकरी टनभर, तर दुसºयावर्षी तीन टन, तिसºया वर्षी चार ते पाच टन उत्पन्न मिळत असून दरवर्षी उत्पन्नात वाढच होते. बारा ते पंधरा वर्षे ड्रॅगन फ्रूटचे उत्पन्न मिळते. ५० ते ६० रुपये किलोला दर मिळाला तरीही ड्रॅगन फ्रूटची शेती परवडते. शेतकºयांनी स्वत:ची नर्सरी सुरु केल्यास त्यापासूनही उत्पन्न मिळविता येते, अशी प्रतिक्रिया येरळा प्रोजेक्ट सोसायटीचे सचिव नारायण देशपांडे यांनी दिली.

Web Title: 'Dragon Fruit' produces 400 tonnes in Sangli district: the demand for the demand is inadequate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.