सांगली - दिल्लीच्या सोनूकडून दोरवड पराभूत : पणुंब्रे वारुण कुस्ती मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:36 PM2018-12-24T23:36:28+5:302018-12-24T23:39:10+5:30

पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात दिल्लीचा पैलवान सोनू याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याच्यावर एका गुणाने विजय मिळविला. श्री जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त या कुस्ती मैदानाचे

Delhi defeats Dorwad by gold: Pandumar Varun wrestling ground | सांगली - दिल्लीच्या सोनूकडून दोरवड पराभूत : पणुंब्रे वारुण कुस्ती मैदान

पणुंब्रे वारुण कुस्ती मैदानात नीरज उबाल यांनी प्रथम क्रमांकाची कुस्ती लावली. यावेळी हणमंत पाटील उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे जोतिबा यात्रेनिमित्त आयोजन; कुस्तीप्रेमींकडून भरभरून दाद

कोकरुड/चरण : पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात दिल्लीचा पैलवान सोनू याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याच्यावर एका गुणाने विजय मिळविला. श्री जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम क्रमांकाच्या लढतीत पुण्याचा भारत मदने जखमी झाल्याने कोल्हापूरच्या विजय गुटाळ यास विजयी घोषित करण्यात आले. प्रारंभी कुस्ती मैदानाचे पूजन हणमंत पाटील, नंदू काका काळे, उपसरपंच प्रकाश पाटील, संचालक शिवाजी पाटील, मोहन पाटील यांच्याहस्ते झाले.

दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कर्नाटक केसरी कार्तिक काटे याने ३४ व्या मिनिटानंतर खेळण्यास नकार दिल्याने कोल्हापूरच्या संतोष सुतार यास विजयी घोषित करण्यात आले. याच क्रमांकासाठी झालेल्या दुसºया लढतीत कोल्हापूरच्या योगेश बोंबाळे याने दिल्ली केसरी सनी सिंग यास टांग डावावर चितपट केले. तिसºया क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरच्या संग्राम पाटील याने विजय धुमाळ याच्यावर घुटना डावावर मात केली. चौथ्या क्रमांकाच्या लढतीत सांगलीचा पांडुरंग मांडवे जखमी झाल्याने कोल्हापूरचा राहुल सरक यास विजयी घोषित केले. पाचव्या क्रमांकाच्या लढतीत स्थानिक मल्ल तात्या इंगळे याने इचलकरंजीच्या अभिजित मानकर यास पाय लावून घिस्सा डावाने चितपट केले. तसेच नीलेश पाटील याने आशितोष गायकवाड याच्यावर दुहेरी पट डावाने विजय मिळविला.

विविध गट : इतर विजयी मल्ल
पणुंब्रे वारुणच्या कुस्ती मैदानात चाहत्यांनी प्रत्येक कुस्तीला भरभरून दाद दिली. यामध्ये बाबू ढेरे, विक्रम चव्हाण, अक्षय नालुगडे, धैर्यशील सकटे, दत्ता बनकर, नाथा चौगुले, बालाजी जाधव, विशाल बिरंजे, महेश शिंदे, अजय केसरे, सुमित खांडेकर, जयेश जाधव, सचिन बिरंजे, जयेश जाधव, रोहन ढेरे, अजय इंगळे, संकेत रूपनवर, तुषार जाधव यांनीही आपापल्या गटात विजय नोंदविला.


 


सांगली

Web Title: Delhi defeats Dorwad by gold: Pandumar Varun wrestling ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.