सहकारातील कीड आधीपासूनच मुकुंदराव तापकीर : सांगली अर्बन बँकेत लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:17 AM2018-01-12T01:17:04+5:302018-01-12T01:17:18+5:30

सांगली : १९७० च्या दशकात सहकार चळवळीला राजकारणाची कीड लागली. त्यामुळे सहकारात भ्रष्टाचार, गटबाजी वाढली.

 Co-operative Kid: Mukundrao Tapakir: An unveiling of the image of Laxmanrao Inamdar on Sangli Urban Bank. | सहकारातील कीड आधीपासूनच मुकुंदराव तापकीर : सांगली अर्बन बँकेत लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेचे अनावरण

सहकारातील कीड आधीपासूनच मुकुंदराव तापकीर : सांगली अर्बन बँकेत लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेचे अनावरण

googlenewsNext

सांगली : १९७० च्या दशकात सहकार चळवळीला राजकारणाची कीड लागली. त्यामुळे सहकारात भ्रष्टाचार, गटबाजी वाढली. या काळात चळवळीला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचे काम लक्ष्मणराव इनामदार यांनी केले, असे प्रतिपादन सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. मुकुंदराव तापकीर यांनी गुरुवारी केले.

येथील सांगली अर्बन बँकेत सहकार भारती स्थापना दिनाचे औचित्य साधून लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमेचे अनावरण डॉ. तापकीर यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, सहकार भारतीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागर चौगुले, जिल्हाध्यक्ष महेश हिंगमिरे, नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर जाधव, भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते.
तापकीर म्हणाले की, विनासंस्कार, नही सहकार या ब्रीदवाक्याप्रमाणे सहकार भारतीचे काम सुरू आहे. सहकार चळवळ ब्रिटिशांनी सुरू केली असली तरी, स्वातंत्र्यानंतर वैकुंठराय मेहता, विठ्ठलराव विखे-पाटील, धनंजयराव गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी ही चळवळ वाढविण्यासाठी मोलाचे योगदान दिले. सावकारी पाशातून शेतकरी, ग्रामीण जनतेची मुक्तता व्हावी, या उद्देशाने सहकार चळवळ उभारली गेली. ती महाराष्ट्रात खºयाअर्थाने विकसित झाली. पण १९७० च्या दशकात सहकार चळवळीत राजकारण शिरले. त्याचे विपरित परिणाम या चळवळीवर झाले. अशा काळात लक्ष्मणराव इनामदार यांनी सहकार भारतीची स्थापना करून या चळवळीला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांच्यामुळे या चळवळीला वेगळी दिशा मिळाली.
इनामदार हे कुठल्याही संस्थेचे संचालक, अध्यक्ष झाले नाहीत. पडद्यामागे राहून काम करणाºया बिनचेहºयाच्या या माणसाने सहकारासाठी व्रतस्थ जीवन वेचले. ते कुठल्याही मोहपाशात अडकले नाहीत. त्यामुळेच आज सहकार भारतीचा मोठा विस्तार होऊ शकला. संस्थांमधील अडचणींचा अभ्यास करून शासनाला उपाय सुचविण्याचे काम सुरू आहे. सहकार भारतीने संशोधन केंद्रही सुरू केले आहे. सहकार चळवळ व्यापक व्हावी, यासाठी व्यावसायिक व्यवस्थापन व सामाजिक जाणिवेचे कार्यकर्ते तयार व्हावेत, यासाठी काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी स्वागत करीत सहकार भारती व सांगली अर्बन बँकेचे नाते अतूट असून, ते कायम राहील, अशी ग्वाही दिली.
सहकार भारतीचे प्रचारक भालचंद्र कुलकर्णी यांनी लक्ष्मणराव इनामदार यांच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, संचालक संजय परमणे, रमेश भाकरे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे मुन्ना कुरणे, शरद नलावडे, शिरीष देशपांडे, नगरसेवक बाळासाहेब काकडे, माजी नगरसेवक प्रा. पद्माकर जगदाळे, हणमंत पवार, शैलेश तेलंग उपस्थित होते.

सहकारातील : दुवा

देशातील ४०० जिल्ह्यात सहकार भारतीचे काम सुरू आहे. आतापर्यंत ३५ हजार संचालक, अधिकारी, कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले आहे. सहकारी संस्था व शासन यांच्यातील दुवा म्हणून सहकार भारती काम करीत आहेत.

Web Title:  Co-operative Kid: Mukundrao Tapakir: An unveiling of the image of Laxmanrao Inamdar on Sangli Urban Bank.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.