पुन्हा पुन्हा सॉरी म्हटल्याने नातं येऊ शकतं अडचणीत; 'ही' आहेत कारणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 01:42 PM2018-07-06T13:42:37+5:302018-07-06T13:44:46+5:30

आपल्या हातून एखादी चूक झाली की लगेचच आपण सॉरी बोलून मोकळे होतो. आपल्याकडून कोणी दुखावले जाण्यापेक्षा सॉरी बोलून समोरच्याची माफी मागणे कधीही चांगले असते, असा सल्लाही अनेकदा आपल्याला आपल्या परिजनांकडून मिळतो.

side effects of saying sorry over and over again in relationship | पुन्हा पुन्हा सॉरी म्हटल्याने नातं येऊ शकतं अडचणीत; 'ही' आहेत कारणे!

पुन्हा पुन्हा सॉरी म्हटल्याने नातं येऊ शकतं अडचणीत; 'ही' आहेत कारणे!

Next

आपल्या हातून एखादी चूक झाली की लगेचच आपण सॉरी बोलून मोकळे होतो. आपल्याकडून कोणी दुखावले जाण्यापेक्षा सॉरी बोलून समोरच्याची माफी मागणे कधीही चांगले असते, असा सल्लाही अनेकदा आपल्याला आपल्या परिजनांकडून मिळतो. परंतु सतत सॉरी बोलणे तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. नेहमी असे होते की, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो किंवा ज्यांना आपल्याला दुखवायचे नसते. त्यांना आपण पटकन सॉरी बोलून टाकतो. कधी कधी तर आपली चूक नसतानाही आपण सॉरी बोलतो. पण असे करणे बरोबर नसून त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमजोर होतो. याशिवाय सतत सॉरी बोलण्याचे मानसशास्त्रज्ञाच्या दृष्टीने अनेक तोटे आहेत. जाणून घेऊयात याबाबत...

मानसिकदृष्ट्या खचणे

सारखे स्वतःला दोषी समजण्याची सवय व्यक्तिचे मानसिकदृष्ट्या खच्चिकरण करते. यामुळे स्वतःबाबत कमीपणाची भावना तयार होते. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, ज्या व्यक्तिंचे बालपण फार शिस्तीत गेले असून ज्यांचे पालक अति काळजी घेत असतील, मोठे झाल्यावर या व्यक्तिंचा आत्मविश्वास फार कमी होतो. कोणत्याही विषयावर निर्णय घेताना या व्यक्ति दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. 

नात्यांमध्ये दुरावा

ज्या व्यक्ति अतिसंवेदनशील असतात त्या लहान लहान गोष्टींचा फार विचार करतात. कोणत्याही जुन्या गोष्टी आठवून समोरच्याला सतत त्यासाठी सॉरी म्हणतात. त्यामुळे समोरची व्यक्ती चांगल्या मूडमध्ये असेल तरिही त्याचा मूड खराब होऊन वादांना सुरुवात होते. या कारणाने नात्यांमध्ये बऱ्याचदा दुरावा येतो.

आपल्या आनंदाचे महत्त्व जाणून घ्या!

आपल्या आसपासच्या व्यक्तिंना खुश ठेवण्यासाठी तसेच त्यांच्याकडून स्तुती करून घेण्यासाठी अशा व्यक्ति सतत दुसऱ्यांच्याच विचारात असतात. त्यामुळे बऱ्याचदा या व्यक्ति 'मीच सर्वांबाबत विचार करते माझा विचार कोणीच करत नाही' या विचाराने ग्रस्त होतात. याचाही दोष स्वतःलाच देऊन दुःखी होतात. 

Web Title: side effects of saying sorry over and over again in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.