निंबोडीजवळ आढळले नवजात अर्भक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 06:04 PM2017-07-26T18:04:38+5:302017-07-26T18:08:13+5:30

लोणंद (जि. सातारा), दि. २३ : खंडाळा तालुक्यातील निंबोडी, पाडळी गावच्या सरहद्दीवर असलेल्या तलावाजवळ बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुरूष जातीचे नवजात अर्भक आढळून आले. अर्भक जिवंत असून त्याच्यावर लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

satara. nimbodi,new child, lonand, hospital, | निंबोडीजवळ आढळले नवजात अर्भक

खंडाळा तालुक्यातील निंबोडी, पाडळी गावच्या सरहद्दीवर असलेल्या तलावाजवळ बुधवारी पुरूष जातीचे नवजात

Next
ठळक मुद्देलोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरूतलावानजिक फडक्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळले. अर्भक जिवंत असून पुरुष जातीचे

लोणंद (जि. सातारा), दि. २३ : खंडाळा तालुक्यातील निंबोडी, पाडळी गावच्या सरहद्दीवर असलेल्या तलावाजवळ बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुरूष जातीचे नवजात अर्भक आढळून आले. अर्भक जिवंत असून त्याच्यावर लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गजानन धायगुडे, हरिभाऊ माने, दत्तात्रय धायगुडे, प्रविण दुरगुडे हे चार युवक बुधवारी सकाळी निंबोडी, पाडळी गावानजिक असलेल्या तलावाजवळून निघाले होते. यावेळी त्यांना तलावानजिक एक नवजात अर्भक फडक्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आले. संबंधित युवकांनी तातडीने अर्भकाला लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

अर्भक जिवंत असून ते पुरुष जातीचे आहे. काही तासांपूर्वीच त्याचा जन्म झाला असल्याची माहिती डॉ. अनिलराजे निंबाळकर यांनी दिली. दरम्यान, अर्भकावर आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार, शुभांगी कुटे करीत आहेत.

Web Title: satara. nimbodi,new child, lonand, hospital,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.