मच्छीमारांनी न्याय मिळेपर्यंत लढ्यास तयार राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:40 AM2018-04-09T02:40:28+5:302018-04-09T02:40:28+5:30

हर्णे बंदरातील मच्छीमार बांधव ज्याप्रमाणे नौका घेऊन समुद्रात गेले आणि त्यांनी एलईडी लाइट(एलईडी विद्युत प्रणाली)ने मच्छीमारी करणारी बोट पकडली त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपली लढाई आपल्यालाच लढून जिंकायची आहे

Stay ready for the fight till fishermen get justice | मच्छीमारांनी न्याय मिळेपर्यंत लढ्यास तयार राहावे

मच्छीमारांनी न्याय मिळेपर्यंत लढ्यास तयार राहावे

Next

बोर्ली मांडला : हर्णे बंदरातील मच्छीमार बांधव ज्याप्रमाणे नौका घेऊन समुद्रात गेले आणि त्यांनी एलईडी लाइट(एलईडी विद्युत प्रणाली)ने मच्छीमारी करणारी बोट पकडली त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपली लढाई आपल्यालाच लढून जिंकायची आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मच्छीमार खलाशी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे यांनी मुरुड तालुक्यातील नांदगाव कोळीवाडा येथे आयोजित एलईडी लाइट मच्छीमारी समस्येबाबत आयोजित सभेत केले.
मच्छीमार बांधवांना सध्याच्या परिस्थितीत भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे ती एलईडी लाइट मच्छीमारी. मच्छीमार बांधवांनी संघर्ष केला मात्र त्याची दखल ही लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी यांनी आजपर्यंत घेतली नाही.फक्त आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही.त्यामुळे आता कोणाच्याही पाठीशी न जाता आपण आपली लढाई लढण्यासाठी सज्ज होणे आवश्यक आहे. मस्यव्यवसाय विभागाचे जाधव नावाचे जॉइंट कमिशनर हे एलईडी लाइट मच्छीमारी आणि पर्सनेटने मच्छीमारी करणाऱ्या धनदांडग्यांना पाठीशी घालत आहे. समुद्रात बेकायदेशीररीत्या मच्छीमारी करीत असणारी बोट पकडून किंवा पकडली गेल्यास त्या बोटीकडून पाच पट दंड आकारला जातो. मात्र आतापर्यंत १३८ बोटी पकडल्या त्याचे काय झाले?असाही सवाल त्यांनी केला. लाकडी नौकांना पर्सनेटने मच्छीमारी करण्याची परवानगी आहे. मात्र फायबर बोटींना नाही. आता तर ९0 टक्के मच्छीमार हे फायबरची बोट वापरत असून त्यावर पर्सनेट वापरत आहेत. रामदास कदम हे मच्छीमार संघाच्या पाठीशी ठामपणे आहेत. मस्यव्यवसाय मंत्री हे कोकणातील नसल्याने त्यांना मच्छीमार बांधवांना उद्भवणारे प्रश्न काय समजणार? आता प्रत्येक गावातील वीस पंचवीस नौकांनी समुद्रात जाऊन एलईडी लाइटने मच्छीमारी करीत असलेली बोट पकडायची आणि त्यावरील खलाशी यांना आपल्या बोटीत घेऊन त्या बोटीवर असणारे एलईडी लाइट, जनरेटर आदी साहित्य समुद्रात नष्ट करायचे, असे विश्वनाथ म्हात्रे यांनी उपस्थित मच्छीमार बांधवांना सांगितले.
>अधिवेशनात मच्छीमारांच्या बाजूने आवाज उठवा
मच्छीमार हा गेली अनेक वर्षे पिढ्यानपिढ्या समुद्रात मच्छीमारी करून उपजीविका करीत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून एलईडी लाइटने मासेमारी राजरोसपणे सुरू आहेत. या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधानपरिषद आमदार जयंत पाटील यांना गेल्या अधिवेशनापूर्वी भेटून एलईडी लाइटने मासेमारी राजरोसपणे सुरू आहे त्यावर अधिवेशनात मच्छीमारांच्या बाजूने आवाज उठवा अशी विनंती केली.
मात्र जयंत पाटील यांनी मच्छीमार बांधवांचा आवाज काही अधिवेशनात उचलला नाही. त्याचप्रमाणे अधिकारीही लक्ष देत नाही. हे सर्व पैसेवाल्यांना पाठीशी घालत आहेत, असे रायगड जिल्हा कोळी समाज संघाचे अध्यक्ष धर्मा घाबरट यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर मनोहर बैले, मोतीराम पाटील, गोरखनाथ नवरीकर, ताराचंद कोंडे, महेंद्र गारडी, लहू रावजी आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Stay ready for the fight till fishermen get justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.