रत्नागिरी : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करा, रवींद्र वायकर यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 04:25 PM2018-05-04T16:25:19+5:302018-05-04T16:25:19+5:30

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

Ratnagiri: Take the necessary measures for the safety of passengers, suggestions of Ravindra Waikar | रत्नागिरी : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करा, रवींद्र वायकर यांच्या सूचना

रत्नागिरी : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करा, रवींद्र वायकर यांच्या सूचना

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना सूचनाबॅरिकेट, दिशादर्शक फलक व अन्य सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना.कंत्राटदारांना दक्ष राहण्याचे निर्देश, कार्यकारी अभियंत्यांना दिले लेखी पत्र

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्ते वाहतुकीतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात. तसे निर्देश या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना देण्यात यावेत, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

मागील वर्षीपासून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीवर याचा परिणाम होताना दिसून येत आहे. एप्रिल - मे महिन्यात मोठ्या प्रमाणात मुंबईहून कोकणात येणाऱ्या व परत जाणाऱ्या प्रवाशांच्या हितासाठी तसेच त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाही प्रवाशांच्या व स्थानिक जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना कंत्रादारांनी न केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे.

मागील काही दिवसांमध्ये दिवाणी खवटी तसेच कशेडी घाट येथे २ ते ३ अपघात झाले असून, यात काही प्रवाशांना प्राणही गमवावे लागले. कशेडी घाटातही अपघात झाल्याचे पालकमंत्री वायकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

चौपदरीकरणाचे काम सुरू असताना कंत्राटदारांनी विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे तसेच आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून मुंबई - गोवा - मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी कंत्राटदारांना धोक्याच्या ठिकाणी बॅरिकेट व दिशादर्शक फलक लावणे, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

सुरक्षेची काळजी नाही

गेल्या काही दिवसात महामार्ग चौपदरीकरणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत अपघातांची संख्या वाढत आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने काम सुरु करताना सुरक्षेची काळजी न घेतल्याने असे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: Ratnagiri: Take the necessary measures for the safety of passengers, suggestions of Ravindra Waikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.