रत्नागिरी : रेल्वेगाड्यांचा आरक्षण कोटा संपला, आयत्यावेळचा प्रवास झाला कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 06:00 PM2018-04-21T18:00:41+5:302018-04-21T18:01:26+5:30

फिरण्यासाठी मे महिन्यात बाहेर पडणार असाल तर आता तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागू शकतो. कारण कोकण मार्गावरून जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या सध्या हाऊसफुल्ल आहेत. मे महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांचा अपवाद सोडला तर मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल असल्याने ऐनवेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

Ratnagiri: Reservation quota ended, difficult times traveled, waiting list in 400 trains | रत्नागिरी : रेल्वेगाड्यांचा आरक्षण कोटा संपला, आयत्यावेळचा प्रवास झाला कठीण

रत्नागिरी : रेल्वेगाड्यांचा आरक्षण कोटा संपला, आयत्यावेळचा प्रवास झाला कठीण

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वेगाड्यांचा आरक्षण कोटा संपलाआयत्यावेळचा प्रवास झाला कठीणअनेक गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादी ४०० वर

विहार तेंडुलकर

रत्नागिरी : फिरण्यासाठी मे महिन्यात बाहेर पडणार असाल तर आता तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागू शकतो. कारण कोकण मार्गावरून जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या सध्या हाऊसफुल्ल आहेत. मे महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांचा अपवाद सोडला तर मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल असल्याने ऐनवेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

मे महिना हा सुट्टीचा हंगाम असल्याने अनेक लोक सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडतात. गेल्या काही वर्षात हे फॅड एवढे वाढले आहे की रेल्वे, बसेस फुल्ल होतातच; त्याशिवाय खासगी व्हॉल्वो तसेच खासगी वाहने घेऊनही अनेकजण कोकणात येतात. त्यामुळे कोकण हाऊसफुल्ल होते.

कोकणात यंदा जादा रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल आहेत. त्यामुळे आयत्यावेळी जर एखाद्या शहरातून मोठ्या शहरात फिरण्यासाठी जाण्याचा मनसुबा असेल, तर त्याला आता मुरड घालावी लागेल अथवा गर्दीतून लोंबकळत प्रवास करावा लागेल. अनेक रेल्वेगाड्यांची आरक्षण स्थिती पाहिल्यास आतापासूनच २०० ते ४००पर्यंत प्रतीक्षा यादी वाढली आहे. त्यामुळे आयत्यावेळी प्रवास ठरवणाऱ्या पर्यटकांना रस्त्याद्वारेच प्रवास करावा लागणार आहे.

मोठ्या उन्हाळी सुट्टीत पर्यटक कोकण आणि गोव्याला मुंबईपेक्षा अधिक पसंत करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अप् (मुंबई) मार्गावरील रेल्वेगाड्यांपेक्षा डाऊन (गोवा) मार्गावरील रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी आहे. मुलांच्या परीक्षा सुरु असल्याने सध्या गर्दीचे प्रमाण कमी आहे. काही पर्यटक कोकणात येण्यासाठी परीक्षा संपल्यानंतर निकाल लागेपर्यंतचा कालावधी निवडतात. निकालानंतर अन्यत्र फिरणेही पसंत करतात.

आरक्षणही बंद झाले

रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या स्थानिक गाड्या मे महिन्यात फुल्ल असणार आहेत. तुतारी एक्स्प्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजरचे दोन्ही आरक्षित डबे, मांडवी एक्स्प्रेस, सावंतवाडी-दिवा रेल्वे, जनशताब्दी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस या गाड्या मे महिन्यात हाऊसफुल्ल असणार आहेत. नेत्रावती एक्स्प्रेसचे तर काही दिवसांचे आरक्षणही बंद झाले आहे. मांडवी एक्स्प्रेससाठी १५०पेक्षा अधिक तर गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेससाठी १६४ ते २४० एवढी प्रतीक्षा यादी आहे.

प्रतीक्षा यादी

मुंबईहून कोकणात येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या तुफानी प्रतिसादात धावणार आहेत. अनेक गाड्यांचे आरक्षण आतापासूनच पूर्ण झाले आहे. तेजस एक्स्प्रेस या रेल्वेगाडीने प्रवास करण्यासाठी सध्या ६९ ते ११० एवढ्या मोठ्या प्रमाणात, मांडवी एक्स्प्रेस २९८ ते ३९७ तर ह्यकोकणकन्याह्णमध्ये तर ३९९ ते ४७० एवढी प्रतीक्षा यादी आहे.

परदेशी पर्यटक कोटाही संपला

काही रेल्वेगाड्यांमध्ये परदेशी पर्यटकांसाठी आरक्षित कोटा असतो. हा कोटाही संपला असून, त्यामुळे मे महिन्यात देशी पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटक कोकणात किती प्रमाणात येतात, याचा अंदाज येईल.

तेजस एक्स्प्रेसचा कोटाही फुल्ल

देशातील सर्वात आलिशान रेल्वे असलेल्या तेजस एक्स्प्रेसचा आरक्षण कोटाही फुल्ल झाला आहे. केवळ पहिल्या आठवड्यात तेजस एक्स्प्रेसला मिळणारा प्रतिसाद सद्यस्थितीत त्यामानाने कमी आहे. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून ते अगदी मे अखेरपर्यंत संपूर्ण रेल्वेगाडीचे आरक्षण पूर्ण झाले आहे.

लांबपल्ल्याच्या गाड्या

गरीबरथ, डबलडेकर या एक्स्प्रेस गाड्याही मे महिन्यात हाऊसफुल्ल आहेत. मे महिन्यातील पहिल्या पाच दिवसात त्यामानाने गर्दी कमी आहे. मात्र, त्यानंतरच्या काळात रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. राजधानी एक्स्प्रेसमध्ये दिनांक ७, १४, २० व २१ मे या दिवसांचे आरक्षण थोड्या प्रमाणात शिल्लक आहे.

Web Title: Ratnagiri: Reservation quota ended, difficult times traveled, waiting list in 400 trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.