रत्नागिरी : गणेशविसर्जन मिरवणुकीत मूषक सारथी देखाव्याने जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 04:44 PM2018-09-22T16:44:13+5:302018-09-22T16:45:40+5:30

रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावातील मारूती ढेपसे हे दिव्यांग असून, दोन्ही पायांनी अपंग आहेत. मात्र, कोणतीही दुचाकी दुरूस्त करण्यात ते निष्णात आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत यावर्षी वेगळं काही करण्याचा ध्यास ढेपसे यांनी घेतला होता. स्वत: मूषक वेश परिधान करून ते बाप्पाचे सारथी झाले. त्यांचा मूषक सारथी देखावा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

Ratnagiri: A moonshine charioteer wins the Ganeshwisharan procession | रत्नागिरी : गणेशविसर्जन मिरवणुकीत मूषक सारथी देखाव्याने जिंकले

रत्नागिरी : गणेशविसर्जन मिरवणुकीत मूषक सारथी देखाव्याने जिंकले

Next
ठळक मुद्देगणेशविसर्जन मिरवणुकीत मूषक सारथी देखाव्याने जिंकलेदिव्यांग मारूती ढेपसे यांची संकल्पना

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील मारूती ढेपसे हे दिव्यांग असून, दोन्ही पायांनी अपंग आहेत. मात्र, कोणतीही दुचाकी दुरूस्त करण्यात ते निष्णात आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत यावर्षी वेगळं काही करण्याचा ध्यास ढेपसे यांनी घेतला होता. स्वत: मूषक वेश परिधान करून ते बाप्पाचे सारथी झाले. त्यांचा मूषक सारथी देखावा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

मारूती ढेपसे व त्यांचे बंधू एकत्रित गणेशोत्सव साजरा करतात. दरवर्षी ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढतात. यावर्षी पारंपरिक मिरवणुकीत काही तरी हटके करावे, असा विचार सुरू असतानाच ढेपसे यांनी मूषक सारथी देखावा सादर करण्याचे ठरविले.

त्यासाठी ढेपसे स्वत: व्हीलचेअर चालवित असून, मूषकाचा वेश परिधान केला. त्यांनी आपल्या भाच्याला गणेशाचा वेश परिधान करायला लावून बाप्पा बनविले. ढेपसे यांच्या मूषक सारथी देखाव्याच्या मागे बाप्पांची मूर्ती हातगाडीवर विराजमान झाली होती.

दिव्यांग असल्याची कोणतीही खंत न बाळगता अतिशय उत्साहाने व हिरीरीने प्रत्येक उपक्रमात सहभागी होत असतात. त्यांच्याच संकल्पनेतून सादर करण्यात आलेल्या मूषक सारथीच्या देखाव्याचे गणेशभक्तांमधून कौतुक करण्यात येत आहे. गणेशविसर्जन मिरवणुकीत सादर केलेल्या या आगळ्या वेगळ्या देखाव्याने साऱ्यांनाच जिंकले.

Web Title: Ratnagiri: A moonshine charioteer wins the Ganeshwisharan procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.