पद्मावती चित्रपटाच्याविरोधात रत्नागिरीत निदर्शने, पुतळा जाळण्यास पोलिसांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 04:49 PM2017-12-02T16:49:18+5:302017-12-02T16:51:49+5:30

संजल लीला भन्साळी यांचा पद्मावती चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी आज रत्नागिरीतील मारूती मंदिर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी संजय भन्साळी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्याला विरोध केल्याने हा पुतळा जाळण्यात आला नाही.

Opposition protest against Padmavati film protesting in Ratnagiri | पद्मावती चित्रपटाच्याविरोधात रत्नागिरीत निदर्शने, पुतळा जाळण्यास पोलिसांचा विरोध

पद्मावती चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी आज रत्नागिरीतील मारूती मंदिर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेतर्फे निदर्शने करण्यात आली.

Next
ठळक मुद्देरत्नागिरीत मारूती मंदिर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेतर्फे निदर्शने संजय भन्साळी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पडला

रत्नागिरी : संजल लीला भन्साळी यांचा पद्मावती चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी आज रत्नागिरीतील मारूती मंदिर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी संजय भन्साळी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्याला विरोध केल्याने हा पुतळा जाळण्यात आला नाही.

चित्रपट गृहात पद्मावती चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, या चित्रपटातून समाजासमोर चुकीचा इतिहास दाखविण्यात येत आहे. चुकीचा इतिहास दाखवून समाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करण्यात येत आहे. इतिहासात अस्तित्वात नसलेले अल्लाउद्दीन व महाराणी पद्मावतीचे प्रेमप्रकरण या चित्रपटात घुसडवण्यात आले आहे.

स्वत:चे व आपल्या बरोबर इतर स्त्रियांचे शील जपण्यासाठी आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या हाती सापडू नये म्हणून तीस हजार राजपूत स्त्रियांसह राणी पद्मावती यांनी चितोडगडावर जोहार केला. म्हणजेच स्वत:ला जिवंतपणी अग्नीच्या हवाली केले. आपले आयुष्य हिंदू धर्माची लाज राखण्यासाठी संपवले. हा खरा इतिहास असताना केवळ ह्यसवंग प्रसिद्धीसाठीह्ण या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

राजपूत समाज व त्यायोगे हिंदू समाजाच्या भावना दुखावणारा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हिंदू समाजाचा हा अपमान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कदापी सहन करणार नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
 

Web Title: Opposition protest against Padmavati film protesting in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.