अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक

By admin | Published: October 31, 2014 12:29 AM2014-10-31T00:29:50+5:302014-10-31T00:30:02+5:30

साखरपा येथील घटनेने संगमेश्वरात खळबळ

Minor girl raped; One arrested | अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक

Next

देवरुख : अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून तिला कणकवली येथे पळवून नेले व पाच महिन्यांच्या कालावधीत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार या मुलीच्या आईने देवरुख पोलीस ठाण्यात दिली असून, याप्रकरणी प्रौढाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटकही करण्यात आली आहे.
गजानन लिंगायत (वय ४५, साखरपा, गुरववाडी) असे या प्रौढाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार गजानन लिंगायत याने २९ मे ते २९ आॅक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत या अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. कणकवली बाजारपेठ (सिंधुदुर्ग) या ठिकाणी नेऊन त्या प्रौढाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे या मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.
मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद यापूर्वीच या मुलीच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात दिली होती. शोधाशोध सुरू असतानाच या नातेवाइकांना गणेश लिंगायत यांनी मुलीला कणकवली येथे नेऊन ठेवल्याची कुणकुण लागली. त्यानंतर नातेवाइकांनी कणकवली येथे धाव घेऊन मुलीला साखरपा येथे आणले. त्यानंतर या मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.
याप्रकरणी लिंगायत याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३६३, ३६६, ३७६ (२) (१) तसेच लैंगिक अत्याचार २०१२ चे कलम (अ) ४/५, (एल) (एन)६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटकही करण्यात आली आहे.
याप्रकरणी तपास देवरुखचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक सखाराम नागले, हेड कॉन्स्टेबल प्रशांत शिंदे, हेड कॉन्स्टेबल उदय चांदणे करीत आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Minor girl raped; One arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.