चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, सोन्याच्या दागिन्यांसह २० लाखांचा ऐवज हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:53 PM2019-03-30T12:53:01+5:302019-03-30T12:56:49+5:30

चिपळूणमध्ये गेल्या तीन महिन्यात घडलेल्या ७ तसेच अन्य जिल्ह्यांमधील घरफोड्यांचा छडा लावण्यात जिल्ह्यातील पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांच्या टोळीवर गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या या टोळीकडून ४ लाखांची इर्टिगा गाडी व सोन्याचे दागिने मिळून २० लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी  दिली.

Intelligence Bureau interrogated for 20 lakhs with gold jewelery | चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, सोन्याच्या दागिन्यांसह २० लाखांचा ऐवज हस्तगत

चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, सोन्याच्या दागिन्यांसह २० लाखांचा ऐवज हस्तगत

ठळक मुद्दे सोन्याच्या दागिन्यांसह २० लाखांचा ऐवज हस्तगतचिपळुण पोलीस, गुन्हे अन्वेषणकडून चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

रत्नागिरी : चिपळूणमध्ये गेल्या तीन महिन्यात घडलेल्या ७ तसेच अन्य जिल्ह्यांमधील घरफोड्यांचा छडा लावण्यात जिल्ह्यातील पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांच्या टोळीवर गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या या टोळीकडून ४ लाखांची इर्टिगा गाडी व सोन्याचे दागिने मिळून २० लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी  दिली.


७ जानेवारी २०१९ रोजी चिपळूण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील परशुरामनगर, रॉयलनगर, बहाद्दूरशेख नाका, शिवाजीनगर, खेर्डी येथे एकाच दिवशी ४ ठिकाणी दिवसा घरफोडीचे गुन्हे घडले होते. याप्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना १२ मार्च २०१९ रोजी चिपळूण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील सती, रावतळे व खेर्डी माळेवाडी, याठिकाणी त्याच प्रकारे दिवसा घरफोडीचे गुन्हे घडले होते.

याप्रकरणीही अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही वेळच्या घरफोड्यांमध्ये पोलिसांना साम्य आढळून आले आणि येथूनच खऱ्या अर्थाने चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले. संशयित इर्टिगाच्या चौकशीत आरोपी उघड झाले.

पोलिसांनी गुन्हे घडलेल्या ७ जानेवारी २०१९ ते १२ मार्च २०१९ या काळातील आजूबाजूच्या परीसरातील सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासले. सी. सी. टी. व्ही. फुटेजच्या आधारे तपास सुरु असताना बहाद्दूरशेख नाका व कुंभार्ली चेकपोस्ट येथील सी. सी. टी. व्ही.मध्ये एक संशयित चंदेरी रंगाची इर्टिगा गाडी दिसून आली.

दोन्ही गुन्ह्यांच्या वेळी या गाडीचे अस्तित्व परिसरात आढळून आले. त्या संशयित गाडीच्या नंबरचा शोध घेण्यात आला असता गाडीचा क्र. एमएच -१८ -एजे - १४८६ असल्याचे आढळून आले. नंबरवरुन मूळ मालक विजय मोरे (रा. ता. जि. धुळे) यांच्याकडे तपास करण्यात आला.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी कैलास चिंतामण मोरे हा साहील पटेल या नावाने इर्टिगा मालकाकडून भाडेतत्त्वावर नेत असल्याची माहीती मिळाली. परंतु तपास पथकाने गुप्त बातमीदार व स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचे खरे नाव व पत्ता शोधून काढला. त्यानंतर कैलास मोरे याला अटक करण्यात आली.

पोलीस पथकाने ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये कैलास चिंतामण मोरे (३८, रा. सोनगिर, ता. जि. धुळे), जयप्रकाश राजाराम यादव उर्फ जे. पी. (२०, दिनदास पूर , पोस्ट ओदार, ता. पिंडरा. जि. वाराणसी, उत्तरप्रदेश, सध्या रा. रुपा कॉलनी, बायपास रोड, सुरत उपनगर रोड, ता. जि. धुळे), अजय प्रकाश कटवाल (२४, रा. नगब बारी, चोफुली, रसराज हॉटेलच्या मागे, देवपूर, ता. जि. धुळे), शरद उर्फ रावसाहेब नामदेव मोरे (२८, रा. शेवाडे, ता. सिंंदखेडा, जि. धुळे) यांचा समावेश आहे. यातील विरेंद्रसिंग ठाकुर (रा. उत्तरप्रदेश) हा अटक होणे बाकी आहे.

पकडलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळाली. पंचनामा करुन मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चिपळूण पोलीस स्थानकातील दाखल गुन्ह्यांचा तपास सुरु असताना यातील आरोपी हे रेकॉर्डवरील असल्याचे व त्यांनी यापूर्वी गुजरात येथे अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. आरोपी यांनी चिपळूणव्यतिरिक्त वर्धा, अमरावती, सातारा, सांगली याठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

आरोपींना ताब्यात घेताना त्यांच्याकडे ६६ ग्रॅम ६१ मिली ग्रॅम वजनाचे १,९०,३०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व स्वीफ्ट डिझायर गाडी क्र. एमएच - ०५ - एएक्स - ९१९९ ही मिळाली आहे. चिपळूण पोलीस स्थानक येथील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल ३८१ ग्रॅम ११० मिली सोने, १०० ग्रॅम चांदी व रोख रक्कम ५४२७९ (गुन्ह्यातील ५२००० रुपये) इर्टिगा गाडी क्र. एमएच - १८ - एजे - १४८६ किंमत ४,००००० रुपये एवढा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

गुन्ह्यातील जप्त सोने, चांदी, वाहने तसेच आरोपी यांच्या अंगझडतीमधील दागिने व वाहन मिळून एकूण १९,९४,८२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या टोळीच्या अटकेमुळे राज्यातील अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळुणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस उपनिरीक्षक विलास पडजळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप गमरे, पोलीस नाईक गगनेश पटेकर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश नार्वेकर, आशिष भालेकर पंकज पडेलकर यांनी केला.

Web Title: Intelligence Bureau interrogated for 20 lakhs with gold jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.