रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना २१ मृत्यू, ६२६ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:41 AM2021-04-30T04:41:09+5:302021-04-30T04:41:09+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने आणखी २१ रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृतांची संख्या ६४० झाली आहे तर ...

Corona 21 deaths, 626 new patients in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना २१ मृत्यू, ६२६ नवे रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना २१ मृत्यू, ६२६ नवे रुग्ण

Next

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने आणखी २१ रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृतांची संख्या ६४० झाली आहे तर ६२६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या २१,६९५ झाली आहे तर ७७२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने एकूण १४,६३५ रुग्ण बरे झाले आहेत.

लॉकडाऊन करूनही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे प्रशासन कोरोनाच्या विराेधात लढा देत असतानाच सर्वच उद्योगधंद्यांवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने व्यापारी, छोटे व्यावसायिक, मोलमजुरी करणाऱे अडचणीत आले आहेत. त्यातच आणखीच लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने रुग्णसंख्या कमी न झाल्यास पुढे काय, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा सततचा चढता आलेख धोकादायक ठरत असतानाच रत्नागिरी तालुक्यात आजही कोरोनाची संख्या जास्त असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात ४४ रुग्ण, हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात १४, कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात २१, जाकादेवी प्राथमिक आराेग्य केंद्र ३, पावस प्राथमिक आराेग्य केंद्र ११, चांदेराई प्राथमिक आराेग्य केंद्र ४, पाली ग्रामीण रुग्णालय १०, तालुका वैद्यकीय अधिकारी ७, वाटद प्राथमिक आराेग्य केंद्र १४, खानू प्राथमिक आराेग्य केंद्र ६, हातखंबा प्राथमिक आराेग्य केंद्र ९ असे एकूण १४३ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात आढळले.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७.४७ टक्के आहे तर मृतांचे प्रमाण २.९४ टक्के आहे.

Web Title: Corona 21 deaths, 626 new patients in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.