प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाºयांवर गुन्हे दाखल होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 01:00 PM2019-04-03T13:00:32+5:302019-04-03T13:01:52+5:30

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्याच प्रशिक्षणाला समर्पक कारणाशिवाय दांडी मारणाºया अधिकारी, कर्मचारी यांच्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम  १९५१ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा

Coaching will be filed for absentee staff? | प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाºयांवर गुन्हे दाखल होणार?

प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाºयांवर गुन्हे दाखल होणार?

Next
ठळक मुद्दे५८ वर्षीय महिलेला केले जटामुक्त 

रत्नागिरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्याच प्रशिक्षणाला समर्पक कारणाशिवाय दांडी मारणाºया अधिकारी, कर्मचारी यांच्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम  १९५१ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील पाच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना आज दिले. त्यामुळे या प्रशिक्षणाला दांडी मारणाºया ३२३ कर्मचाºयांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार ३० आणि ३१ मार्च रोजी रत्नागिरीत पहिलेच प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यात रत्नागिरी, राजापूर, दापोली, गुहागर आणि चिपळूण या विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकारी अशा एकूण ८६५९ प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. 

मात्र, या दोन दिवसांच्या प्रशिक्षणाला या पाचही मतदार संघातील मिळून ८३३६ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उर्वरित ३२३ जणांनी दांडी मारली. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या अनुपस्थित राहिलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

ही नियुक्ती निवडणूक आयोग यांच्या अधिसूचनेच्या आधारे करण्यात आली होती. या प्रशिक्षणास अनुपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यामुळे निवडणूक कामात बाधा निर्माण झाल्याचे दिसून येते.  त्यामुळे अनुपस्थित असलेल्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून ४८ तासात खुलासे प्राप्त करुन घेण्यात यावेत. समर्पक कारणाशिवाय प्रशिक्षणास गैरहजर राहणाºया अधिकारी, कर्मचारी यांच्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम  १९५१चे कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल करावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

विधानसभा मतदार संघनिहाय उपस्थित व अनुपस्थित प्रशिक्षणार्थींची संख्या

मतदार संघ एकूण उपस्थित अनुपस्थित

दापोली १८३८ १७४१ ९७

गुहागर १४२३ १४१३ १०

चिपळूण १६९३ १६६९ २४

रत्नागिरी १९९५ १८२९ १६६

राजापूर १७१० १६८४ २६

एकूण ८६५९ ८३३६ ३२३ 

Web Title: Coaching will be filed for absentee staff?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.