डिझेलटंचाईमुळे रत्नागिरीत बससेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 05:09 PM2018-11-13T17:09:34+5:302018-11-13T17:11:38+5:30

दिपावलीच्या सुट्ट्या असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारासाठी लागणारा डिझेल टँकरसाठी सोमवार रात्री ऊशिरा मागणी करण्यात आली. मात्र तो येण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी डिझेल संपल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण एस. टी. सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. फेऱ्या अर्धा तास उशिराच्या फरकाने धावत होत्या. मात्र, दुपारनंतर स्थिती पुन्हा पूर्ववत झाली.

Bus services in Ratnagiri disrupted due to the deteriorating situation | डिझेलटंचाईमुळे रत्नागिरीत बससेवा विस्कळीत

डिझेलटंचाईमुळे रत्नागिरीत बससेवा विस्कळीत

Next
ठळक मुद्देडिझेलटंचाईमुळे रत्नागिरीत बससेवा विस्कळीतदुपारनंतर स्थिती पुन्हा पूर्ववत

रत्नागिरी : दिपावलीच्या सुट्ट्या असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारासाठी लागणारा डिझेल टँकरसाठी सोमवार रात्री ऊशिरा मागणी करण्यात आली. मात्र तो येण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी डिझेल संपल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण एस. टी. सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. फेऱ्या अर्धा तास उशिराच्या फरकाने धावत होत्या. मात्र, दुपारनंतर स्थिती पुन्हा पूर्ववत झाली.

दिपावलीची सुट्टी दि. ५ ते १० नोव्हेंबर अखेर असल्याने दि.१२ रोजी कार्यालये पूर्ववत सुरू झाली. बँका बंद असल्यामुळे डिझेलसाठी लागणारी रक्कम सोमवारी बँकेत जमा करण्यात आल्यानंतर ऊशिरा टँकर मागणी करण्यात आली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागीय कार्यशाळेत दररोज ५५ लाख रुपयांचे उत्पन्न जमा होते.

दरमहा १८ ते २० कोटीची रक्कम असल्याने बँकेतर्फे वाहन पाठवून रक्कम रोजच्या रोज बँकेत जमा केली जाते.
दुसरा व चौथा शनिवारी बँका बंद असताना रक्कम तर जमा होत असल्याने डिझेलसाठी लागणारी रक्कम वापरता येत नाही. त्यासाठीचे चलन तयार करता येत नाही.

शनिवार, रविवार जोडून सुट्टी आल्यानंतर सोमवारीच डिझेलसाठी पैसे वापरले जातात. डिझेलसाठीचे चलन तयार केल्यानंतरच कंपनीकडून टँकर पाठविले जातात. त्यामुळे सोमवारी डिझेलसाठीचे चलन भरल्यानंतर मंगळवारी दुपारी टँकराला परंतु सकाळीच डिझेल संपल्यामुळे राजापूर आगारातून डिझेल मागणविण्यात आले.

राजापूरातून डिझेल आणलेनंतर गाड्यांमध्ये भरण्यात आले. परंतु दरम्यानच्या काळात शहरी तसेच ग्रामीण भागातील फेऱ्यावर त्याचा परिणाम झाला. गाड्या ऊशिरा धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. रत्नागिरी बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.

शहरी प्रवाशी संतप्त

रत्नागिरी शहरी बसवाहतुकीवरही डिझेलटंचाईचा परिणाम झाला. अनेक फेऱ्या उशिरा सुटल्याने प्रवाशी संतप्त झाले होते. दुपारी १.१५ ते १.४५ यावेळेत केवळ कारवांचीवाडी ही एकच बस सोडण्यात आली. त्यामुळे मजगावकडे जाणाऱ्या प्रवाशांनी एकच हंगामा केला. काही नागरिकांनी कारवांचीवाडी बस थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहकाने याबाबत वाहतूक नियंत्रक कक्षाशी संपर्क साधण्यास सांगून बस पुढे जाऊ दिली. विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रक कक्षात यादरम्यान कुणीच नव्हते

Web Title: Bus services in Ratnagiri disrupted due to the deteriorating situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.