उमेदवार आयात करावा लागणे हे भाजपचे दुर्दैव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:19 AM2018-06-22T00:19:07+5:302018-06-22T00:19:07+5:30

BJP's misfortune has to be imported by the BJP | उमेदवार आयात करावा लागणे हे भाजपचे दुर्दैव

उमेदवार आयात करावा लागणे हे भाजपचे दुर्दैव

Next


रत्नागिरी : राष्टÑीय पक्ष म्हणविणाऱ्या भाजपकडे स्वत:च्या पक्षाचा उमेदवार नाही. त्यांना उमेद्वार आयात करावा लागतो हे त्यांचे दुर्दैव आहे. याआधी जे पदवीधरचे आमदार होते व आता ज्यांना भाजपने आयात करून उमेद्वारी दिली आहे, त्यांनी गेल्या सहा वर्षांत मतदारसंघात तोंडही दाखवले नाही. त्यामुळे येथील मतदारांनी शिवसेनेच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केल्याने सेना उमेद्वार संजय मोरे यांचा विजय निश्चित आहे, असा दावा राज्याचे बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यात घटक पक्ष भाजप व केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जाऊन रस्त्यावर उतरून ते सोडवून घेत आहोत. आम्ही सरकारमध्ये असलो तरी अजून सरकारजमा झालेलो नाही. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा लढा सुरूच आहे. त्यामध्ये आम्हाला यशही येत आहे. पालघरच्या पोटनिवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर केला गेला. अखेरच्या क्षणी २८९ बूथ बंद केले गेले; मात्र शिवसेना या सर्वांना पुरून उरली आहे. शिवसेनेचा तो नैतिक विजयच आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात २५ जून रोजी होणाºया निवडणुकीतही साम, दाम, दंड, भेद असे प्रकार होऊ शकतात, असेही शिंदे म्हणाले.
जिंकण्यासाठी संगणक पार्सल?
शिवसेनेच्या जोरदार प्रचारामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच डावखरेंना पदवीधरांचे मतदान व्हावे म्हणून संगणकाची पार्सल काही ठिकाणी पाठविली गेली आहेत. प्रलोभने दाखवली जात आहेत. गुप्त बैठका होत आहेत. त्यातून भाजपच्या हाती काहीच लागणार नाही. संबंधित संस्थांनी संगणकाची पार्सले परत घेऊन जाण्यास सांगितल्याचा दावा शिंदे यांनी केला.

Web Title: BJP's misfortune has to be imported by the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.