जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपये; भाजपच्या नेत्यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 01:56 PM2023-10-14T13:56:54+5:302023-10-14T13:58:09+5:30

‘जवळजवळ १०० लॉकर्समध्ये सुमारे ५०० कोटी रुपये व ५० किलो सोने आहे. पोलिसांनी येथे येऊन हे लॉकर्स उघडेपर्यंत मी गेटवरच ठिय्या मारीन.

50 kg gold and Rs 500 crore in 100 private lockers in Jaipur; BJP leaders claim | जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपये; भाजपच्या नेत्यांचा दावा 

जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपये; भाजपच्या नेत्यांचा दावा 

जयपूर : जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपयांचा काळा पैसा ठेवण्यात आला आहे, असा आरोप भाजपचे राज्यसभा सदस्य किरोडीलाल मीना यांनी शुक्रवारी केला. हे लॉकर्स कोणाचे आहेत, हे मात्र त्यांनी उघड केले नाही.

‘जवळजवळ १०० लॉकर्समध्ये सुमारे ५०० कोटी रुपये व ५० किलो सोने आहे. पोलिसांनी येथे येऊन हे लॉकर्स उघडेपर्यंत मी गेटवरच ठिय्या मारीन.’ असे त्यांनी सांगितले. किरोडीलाल मीना हे भाजपचे सवाई माधोपूर  मतदारसंघातील उमेदवार आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ज्या इमारतीत लॉकर्स आहेत तेथे येण्याची पत्रकारांना विनंती केली. त्यानंतर संबंधित इमारतीत जाऊन त्यांनी जयपूर पोलिसांनी लॉकर्स उघडावेत, अशी मागणी करीत तेथे धरणे धरले.

Web Title: 50 kg gold and Rs 500 crore in 100 private lockers in Jaipur; BJP leaders claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.