समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार-2016 जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 11:28 PM2017-11-25T23:28:30+5:302017-11-25T23:28:49+5:30

वर्ष 2016चे समर्थन मानवी हक्कवार्ता पुरस्कार समर्थनचे संस्थापक श्री.विवेक पंडित यांनी जाहीर केले आहेत. मुद्रित माध्यमातून श्री. हनीफ अकबरशेख, (दै. पुढारी, जि.पालघर), श्री. संजीवपंढरीनाथ भागवत, (दै. प्रहार, मुंबई) यांना तर दृक श्राव्य माध्यमातून श्री. हर्षद रमाकांतपाटील (झी-24 तास, जि. पालघर) यांनौसमर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार2016'ने सन्मानित करण्यात येणार आहे.

Support released by the Human Rights Dialogue Awards-2013 | समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार-2016 जाहीर

समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार-2016 जाहीर

Next

अलिबाग :  वर्ष 2016चे समर्थन मानवी हक्कवार्ता पुरस्कार समर्थनचे संस्थापक श्री.विवेक पंडित यांनी जाहीर केले आहेत. मुद्रित माध्यमातून श्री. हनीफ अकबरशेख, (दै. पुढारी, जि.पालघर), श्री. संजीवपंढरीनाथ भागवत, (दै. प्रहार, मुंबई) यांना तर दृक श्राव्य माध्यमातून श्री. हर्षद रमाकांतपाटील (झी-24 तास, जि. पालघर) यांनौसमर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार2016'ने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच मुद्रित माध्यमातील श्रीम. माधवी माणिक सावंत (दै. कृषीवल, जि. रायगड) व श्री. राहुल विलास वाडेकर (दै. लोकमत, जि.पालघर) यांना आपल्या लेखणीच्यामाध्यमातून केलेल्या लिखाणास उत्तेजनार्थपुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.
मुद्रित माध्यमांसाठी दोन व दृकश्राव्य माध्यमांसाठी 1 असे तीन पुरस्कारदेण्यात येत आहेत. या पुरस्काराचे स्वरुप5,000/- रुपये रोख, मानचिन्ह व प्रशस्तीपत्रअसे आहे. तसेच इतर उल्लेखनीयकामगिरीसाठी दोन उत्तेजनार्थ पुरस्कारदेखील दिले जात आहेत. समाजातीलउपेक्षित घटकांचे प्रतिबिंब राज्याच्या धोरणातउमटावे या उद्देशाने समर्थन' सातत्यानेप्रयत्नशील आहे.  त्याचाच एक भाग म्हणूनविविध सामाजिक समस्यांना वाचा फोडूनउपेक्षितांच्या मूलभूत हक्कांची जपणूककरणाऱया ग्रामीण भागातील निर्भिडपत्रकारांचे मनोधैर्य उंचावण्याच्या उद्देशाने वत्यांना प्रोत्साहन देण्याच्या भावनेने समर्थनतर्फेगेली 21वर्षे सातत्याने समर्थन मानवी हक्कवार्ता पुरस्कार' देण्यात येत आहेत.
यावर्षी मुद्रित व दृक-श्राव्य माध्यमांसाठीपुरस्कार विजेत्यांची निवड हिंदुस्थानटाइम्स' या दैनिकाचे सहसंपादक 
मान. श्री. शैलेश गायकवाड  व एशियनएज या दैनिकाचे विशेष वार्ताहर मान. श्री.अमेय तिरोडकर  यांनी  तर जय महाराष्ट्र  वृत्त वाहिनीचे संपादक  मान. श्री. तुलसीदास भोईटे यांनी केली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन लवकरच मुंबई येथे करण्यात येणार आहे.

Web Title: Support released by the Human Rights Dialogue Awards-2013

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड