ऑनलाइन मार्केटिंगमुळे शेतमालाला येणार सुगीचे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 11:47 PM2019-01-31T23:47:29+5:302019-01-31T23:48:05+5:30

ऑनलाइन विक्री व्यवहाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक ओळख मिळणार

Sugar Day will come to Farmland due to online marketing | ऑनलाइन मार्केटिंगमुळे शेतमालाला येणार सुगीचे दिवस

ऑनलाइन मार्केटिंगमुळे शेतमालाला येणार सुगीचे दिवस

Next

- आविष्कार देसाई 

अलिबाग : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद पेण येथे शेतमाल विक्री केंद्र उभारणार आहे. ऑनलाइन विक्री व्यवहाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक ओळख निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी मालामाल होऊन त्यांना सुगीचे दिवस येण्यास मदत मिळणार आहे.

पेण येथे शेतमाल विक्री केंद्र उभारणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी दिली. शेतमाल विक्री केंद्र उभारण्यासाठी लागणाºया विविध सोयी-सुविधा लवकरच निर्माण करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यात भाताबरोबरच आंबा, काजू, चिकू, तोंडली, कांदा, अशा अनेक पिकांबरोबरच फळे आणि भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते; परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकºयांनी घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही. त्याचा फायदा व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने घेतो. जिल्ह्यातील शेतकºयांच्या सर्वच पिकाला चांगला दर मिळावा, त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी शेतमालासाठी विक्र ी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत केल्याचे पाटील यांनी सांगितले.

शेतमालाचे ऑनलाइन मार्के टिंग करून थेट शेतकºयांना विक्री केलेल्या मालाची रक्कम मिळवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यातून करण्यात येणार आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम पेणमध्ये उभारण्यात येणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकºयांना सर्व पिकाची माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे. शेतकºयांनाही आधुनिक शेती पद्धतीचे महत्त्व, मार्गदर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या उपक्रमातून कृषी पर्यटनवाढीला चालना मिळण्यास मदत मिळेल.

ऑनलाइन मार्केटिंगमुळे शेतकरी होणार मालामाल
ऑनलाइन विक्री व्यवहारामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतमालाला थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची कवाडे खुली होण्यास मदतच होणार आहे.
अलिबाग तालुक्यातील हापूस आंबा जागतिक स्तरावर पोहोचला, त्याचप्रमाणे येथील विविध पिकांनाही त्याच दिशेने नेता येणे शक्य होणार आहे.
आॅनलाइन मार्केटिंगमुळे अडते, दलाल हे बाजूला पडून थेट उत्पादक शेतकरी ते ग्राहक असा व्यवहार होणार असल्याचा फायदा येथील शेतकºयांना होऊन शेतकरी चांगलाच मालामाल होणार असल्याचे बोलले जाते.

पर्यटकांना शेतमालाशी जोडणार
जिल्ह्यातील लहान शेतकºयांपासून मोठ्या शेतकºयांचा आर्थिक विकास या केंद्राद्वारे होणार आहे. आॅनलाइन नोंदणी करून स्थानिक शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकºयांनी उत्पादित केलेल्या सर्व मालाची चव, वैशिष्ट्ये याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यावरही विशेष भर देणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी सांगितले.

शेतमाल विक्री केंद्र ठरणार मैलाचा दगड
रायगड जिल्हा देशाचे आर्थिक केंद्र असणाºया मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. कित्येक वर्षे रायगड जिल्ह्यात विविध शेतमालाचे प्रचंड उत्पादन घेतले गेले. मात्र, शेतकºयांना त्याचा योग्य दर कधीच मिळाला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनसुद्धा शेतमालाच्या बाबतीमध्ये रायगड जिल्हा मागासलेलाच राहिला, असे म्हणणे योग्य ठरेल. पेण येथे विक्री केंद्र उभारण्याचा रायगड जिल्हा परिषदेने घेतलेला निर्णय जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

Web Title: Sugar Day will come to Farmland due to online marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.