निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:54 AM2018-05-12T01:54:19+5:302018-05-12T01:54:19+5:30

निवडणूक उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या तिसऱ्या दिवसअखेर पेणमधील ८ ग्रा. पं.च्या सरपंचपदासाठी २२ उमेदवारी अर्ज तर ८४ सदस्यांच्या जागांसाठी १२५ उमेदवारी सादर करण्यात आले

Shaving for filing nomination papers | निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग शिगेला

निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग शिगेला

Next

पेण : निवडणूक उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या तिसऱ्या दिवसअखेर पेणमधील ८ ग्रा. पं.च्या सरपंचपदासाठी २२ उमेदवारी अर्ज तर ८४ सदस्यांच्या जागांसाठी १२५ उमेदवारी सादर करण्यात आले असून, सरपंचपदासाठी होणाºया अटीतटीच्या लढतीमध्ये अनेक दिग्गजांनी आपले अर्ज सादर केले आहेत.
तिसºया दिवशी बोरी सरपंचपदासाठी शिवसेना तालुका प्रमुखाच्या पत्नी प्रतिभा म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला. वडखळ ग्रा. पं. सरपंचपदासाठी नीलेश म्हात्रे, राजेश मोकल व सरिता म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरले. दिव ग्रा. पं. सरपंचपदासाठी जयप्रकाश ठाकूर, मंगलदास ठाकूर, अरुण म्हात्रे व मनीषा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज भरले. वाशी ग्रा. पं. सरपंचपदासाठी संदेश ठाकूर, गोरखनाथ पाटील व प्रवीण पाटील यांनी अर्ज भरले. बळवली ग्रा. पं. सरपंचपदासाठी संजय डंगर यांनी उमेदवारी अर्ज भरला. तरणखोप ग्रा. पं. सरपंचपदासाठी जगदीश ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर दुष्मी-खारपाडा ग्रा. पं. सरपंचपदासाठी नेत्रा घरत, रश्मी भगत, प्रिया घरत यांनी उमेदवारी अर्ज भरला. सरपंचपदाच्या थेट निवडणुकीसाठी या सर्व उमेदवारांनी या अगोदर ग्रा. पं.च्या कार्यकारिणीमध्ये अनुभव असल्याने या लढती रंगतदार व प्रेक्षणीय ठरणार आहेत.
शेवटचे दोन दिवस बाकी असल्याने सरपंचपदाच्या उमेदवारांचा आकडा मोठा होणार आहे. याशिवाय ग्रा. पं. सदस्यांच्या जागांमध्ये बोरी ९ जागांसाठी ६, वाशी ११ जागांसाठी १८ अर्ज, वडखळ १५ जागांसाठी २५ अर्ज, दुष्मी-खारपाडा ११ जागांसाठी ४१ अर्ज, तरणखोप ११ जागांसाठी ६ अर्ज, दिव ९ जागांसाठी ६ अर्ज आज तिसºया दिवस अखेर सादर झाले आहेत.
शिवसेनेतर्फे बोरी व तरणखोप ग्रा. पं. साठी अनुक्रमे प्रतिभा म्हात्रे व जगदीश ठाकूर या पेण तालुक्यात सेनेचे प्रमुख पदाधिकारी असलेल्यांनी उमेदवारी अर्ज सरपंचपदासाठी भरले. प्रतिभा म्हात्रे व अविनाश म्हात्रे यांनी सलग दहा वर्षे बोरी सरपंचपद सांभाळले आहे.

काशिद ग्रामपंचायतीत दुरंगी लढतीची शक्यता
मुरु ड जंजिरा : काशिद ग्रामपंचायतीची निवडणूक यंदा बिनविरोध होणार नसल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. गावातील अनेक कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदार पंडित पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला होता. काशिद गावात राहणारे भरत बेलोसे यांनी सुद्धा आपल्या सहकाºयांचे फॉर्म भरण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु ते विकास आघाडी करून निवडणूक लढणार की, शिवसेनेतर्फे निवडणूक लढणार हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे एकीकडे नामवंत नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षात केलेला प्रवेश तर दुसºया बाजूने भरत बेलोसे यांनी निवडणुकीकरिता केलेली तयारी त्यामुळे सदरची निवडणुक दुरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भरत बेलोसे यांनी यावेळी आमच्या उमेदवारांचे फॉर्म लवकरच भरणार असून फॉर्म भरावयास येऊ तेव्हाच कोणत्या पक्षाकडून लढणार आहोत, असे स्पष्ट केले. तर ग्रामपंचायत सदस्य संतोष राणे सुद्धा शुक्र वारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राणे हे भरत बेलोसे यांचे कट्टर समर्थक आहेत. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की,भरत बेलोसे हे शिवसेनेकडूनच निवडणूक लढवतील असे झाले तर काशिद ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना विरु द्ध शेकाप अशी सरळ लढत पाहावयास मिळेल. काशिद ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद हे महिलांसाठी खुल्या प्रवर्गाचे आहे. थेट सरपंच व नऊ ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी १२८८ जण मतदान करणार आहेत. दरम्यान, काशिद येथील समाजसेवक अंकुश चाचे यांनी ग्रामपंचायत सदस्यासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्या नम्रता कासार व माजी सरपंच विकास दिवेकर या वेळी सोबत होते.

Web Title: Shaving for filing nomination papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.