जन्मोत्सवासाठी पालीत यंत्रणा सज्ज; भाविक शहरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 03:01 AM2018-01-21T03:01:12+5:302018-01-21T03:01:27+5:30

पालीत श्री बल्लाळेश्वराच्या जन्मोत्सव रविवार, २१ जानेवारीला मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवासाठी देशभरातून भाविक येत असून, शनिवारपासून भाविकांची शहरात गर्दी होऊ लागली आहे.

 Ready for polytechnic machinery; In the city of devotees enter | जन्मोत्सवासाठी पालीत यंत्रणा सज्ज; भाविक शहरात दाखल

जन्मोत्सवासाठी पालीत यंत्रणा सज्ज; भाविक शहरात दाखल

Next

राबगाव / पाली : पालीत श्री बल्लाळेश्वराच्या जन्मोत्सव रविवार, २१ जानेवारीला मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवासाठी देशभरातून भाविक येत असून, शनिवारपासून भाविकांची शहरात गर्दी होऊ लागली आहे.
यंदा उत्सव रविवारी आल्यामुळे नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
जिल्ह्यातून अधिकचे पोलीस पालीत बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. यात एक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, ५२ पुरु ष पोलीस कर्मचारी, २० महिला पोलीस कर्मचारी आणि २० वाहतूक पोलीस कर्मचारी असा फौजफाटा पाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. हे सर्व कर्मचारी पाली पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालीत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करणार आहेत.
उत्सवासाठी देवस्थानने हायवे लगत पार्किंगची सोय केली
असून, भाविकांना मंदिरापर्यंत येण्यासाठी व जाण्यासाठी विक्र म रिक्षाची सोय केली आहे. एसटी महामंडळाने जादा गाड्यांची कुमक मागवली असून, पनवेल, मुंबई तसेच ठाणेवरून जादा गाड्या सुटणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक यांनी दिली.
पालीत मंदिर परिसर ते अगदी जुन्या स्टँडपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दुकाने मांडली असून, रस्ते माणसांनी फुलून गेले आहेत. यावर्षी दर्शनासाठी किमान दीड ते दोन लाख भाविक येतील, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. पाली तहसीलदार बी. एन. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनही कामाला लागले आहे. पाली देवस्थानकडून येणाºया भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, याकरिता नियोजित रांगेची व्यवस्था केली
आहे.
भाविकांना रागेतच चहा व पाण्याची व्यवस्थादेखील केली आहे, तसेच मंदिराच्या समोरील भागात मोफत नाश्तादेखील देण्यात येणार आहे, असे देवस्थानचे सरपंच धनंजय धारप यांनी सागितले.

Web Title:  Ready for polytechnic machinery; In the city of devotees enter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड