पीक कर्जमाफीच्या कार्यवाहीला सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:43 AM2017-07-31T00:43:41+5:302017-07-31T00:43:41+5:30

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी योजना सुरू केली आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने सहकार विभागाच्या वतीने कर्जमाफीस पात्र असणाºया शेतकºयांकडून

paika-karajamaaphaicayaa-kaarayavaahailaa-saurau-vaata | पीक कर्जमाफीच्या कार्यवाहीला सुरु वात

पीक कर्जमाफीच्या कार्यवाहीला सुरु वात

Next

विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी योजना सुरू केली आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने सहकार विभागाच्या वतीने कर्जमाफीस पात्र असणाºया शेतकºयांकडून आॅनलाइन व आॅफलाइन असा दोन्ही पद्धतीने अर्ज भरून घेण्यास सुरु वात झाली आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेला संलग्न असणाºया सर्व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या शेतकºयांचे फॉर्म बँकेच्या मदतीने भरून देण्याच्या सूचना बँकेने संस्थांच्या सचिवांना केल्या आहेत.
हा फॉर्म रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केलेल्या महा ई-सेवा केंद्रात देखील शेतकºयांना कर्जमाफीचे मोफत अर्ज भरण्याची सोय केली आहे. शेतकºयांना हा फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड समवेत मोबाइल क्र मांक लिंक केलेले आधारकार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड असेल, परंतु त्यास मोबाइल क्र मांक लिंक केलेला नसेल तर अशा शेतकºयांचे बायोमेट्रिक्स पद्धतीने हे अर्ज भरून घेतले जाणार आहेत.
जिल्ह्यामध्ये आॅनलाइन कर्जमाफीचे फॉर्म भरताना काही तांत्रिक अडचणी येत असल्यातरी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे क्षेत्रीय कर्मचारी यामध्ये शेतकºयांना साह्य करीत आहेत. यासंबंधित रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संलग्न असणाºया वि.का.सेवा सहकारी संस्थांच्या शेतकºयांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखा किंवा संस्थांचे सचिव यांच्याशी संपर्क साधायचा आहे, त्यानंतर शेतकºयांनी आपली माहिती त्वरित जवळच्या महा ई-सेवा केंद्रावरती सादर करावयाची आहे.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या शेतकºयांचे आॅफलाइन पद्धतीने देखील फॉर्म भरून घेतले जात आहेत. यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांनी शासनाच्या योजनेतील निकषांच्या आधारावर कर्जमाफी वा प्रोत्साहनपर इतर लाभ मिळवण्यासाठी त्वरित फॉर्म भरावे, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: paika-karajamaaphaicayaa-kaarayavaahailaa-saurau-vaata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.