माथेरानची मिनीट्रेन पाच दिवस आधीच पावसाळी सुटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:48 AM2018-06-12T04:48:56+5:302018-06-12T04:48:56+5:30

नॅरोगेजवर चालणारी नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सोमवार, ११ जूनपासून बंद करण्यात आली आहे. मात्र नॅरोगेज मार्गावरील अमन लॉज-माथेरान-अमनलॉज ही शटल सेवा पावसाळ्यात देखील सुरु राहणार आहे.

Matheran's mintrain Service close five days before | माथेरानची मिनीट्रेन पाच दिवस आधीच पावसाळी सुटीवर

माथेरानची मिनीट्रेन पाच दिवस आधीच पावसाळी सुटीवर

googlenewsNext

कर्जत : नॅरोगेजवर चालणारी नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सोमवार, ११ जूनपासून बंद करण्यात आली आहे. मात्र नॅरोगेज मार्गावरील अमन लॉज-माथेरान-अमनलॉज ही शटल सेवा पावसाळ्यात देखील सुरु राहणार आहे. यंदा पावसाळ्यात प्रथमच नेरळ-माथेरान-नेरळ प्रवासी सेवा आपल्या शिरस्त्याआधी पाच दिवस बंद झाली आहे. नेहमी १५ जूनपासून ही सेवा बंद करण्यात येते.
नेरळ-माथेरान-नेरळ या २१ किलोमीटर लांबीच्या नॅरोगेज ट्रॅकवर १९०७ मध्ये मिनीट्रेन सुरू झाली. या मार्गातील वेडीवाकडी वळणे आणि तीव्र उतार यामुळे मिनीट्रेन ब्रिटिश काळापासून पावसाळ्यात बंद ठेवली जाते. दरवर्षी १५ जून ते १५ आॅक्टोबर या कालावधीत नेरळ-माथेरान-नेरळ ही प्रवासी वाहतूक बंद ठेवली जाते. ९ मे २०१६ मध्ये मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्यानंतर तब्बल २० महिन्यांनी म्हणजे २६ जानेवारी २०१८ रोजी मिनीट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली होती. या दरम्यान शुक्र वार वगळता दररोज एक गाडी चालविली जायची. दररोज सकाळी जाणारी गाडी सायंकाळी ३.४० ला माथेरान येथून पुन्हा नेरळकरिता रवाना होत होती. तर शुक्र वारी नेरळ येथून जाणारी मिनीट्रेन मंगळवारी माथेरान येथून नेरळकरिता सोडली जात होती.
मात्र पावसाळा सुरू झाल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची प्रवासी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला केला. त्यामुळे नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान १५ आॅक्टोबरपर्यंत कोणतीही प्रवासी वाहतूक होणार नाही. नेरळ-माथेरान-नेरळ नॅरोगेज मार्गावर मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असली तरी पर्यटकांसाठी मिनीट्रेनची शटल सेवा सुरूच राहणार आहे. त्यासाठी दररोज सकाळी ६.४० वाजता मिनीट्रेन नेरळ येथून निघेल, परंतु त्या गाडीमध्ये प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी नाही. ही ट्रेन नंतर शटल सेवा होऊन अमन लॉज-माथेरान-अमन लॉज अशी प्रवाशांसाठी चालविली जाणार आहे.

ऐन पर्यटन हंगामात फेऱ्या कमी
ब्रिटिशकाळापासून नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक १५ जूननंतर बंद होते, यावर्षी पाच दिवस आधी बंद
शटल सेवेसाठी गाडी नेरळ तसेच माथेरान स्थानकातून सुटणार, पण त्या गाडीत प्रवास करण्याची परवानगी नाही
यंदा पहिल्यांदा पर्यटन हंगामात चार पेक्षा कमी फेºया नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान झाल्या आहेत.
 

Web Title: Matheran's mintrain Service close five days before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.