जिल्ह्यात आंबा बागायतदार चिंतित, मोहोर गळून जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 03:06 AM2018-03-16T03:06:30+5:302018-03-16T03:06:30+5:30

मुरुड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी तापमान ३९ डिग्री सेल्सियस एवढे होते. उन्हामुळे नागरिकांची काहिली होत असतानाच गुरुवारी अचानक वातावरण बदलले. सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडला.

Mango farmers in the district are worried about the collapse of the blooms | जिल्ह्यात आंबा बागायतदार चिंतित, मोहोर गळून जाण्याची भीती

जिल्ह्यात आंबा बागायतदार चिंतित, मोहोर गळून जाण्याची भीती

Next

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी तापमान ३९ डिग्री सेल्सियस एवढे होते. उन्हामुळे नागरिकांची काहिली होत असतानाच गुरुवारी अचानक वातावरण बदलले. सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडला. मुरुड तालुक्यात आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक झाडांवर मोहोर फुलला आहे. मात्र अचानक वातावरणात बदलल्याने आंबा पिकावर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
याबाबत खारआंबोली येथील बागायतदार मनोज कमाने यांच्याशी संपर्क साधला असता, ढगाळ वातावरण आंब्यासाठी पोषक नाही. काही प्रमाणात पाऊस सुद्धा पडल्याने आंब्यावरील मोहर गळून पडला आहे. आंब्याच्या फळास कीड व बुरशी लागण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून जोरदार वाऱ्यामुळे झाडावरील काही फळे गळून पडल्याचे त्यांनी सांगितले. या अस्मानी संकटामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. आंब्याबरोबरच कडधान्य पिकाचे नुकसान होण्याची भीतीही शेतकºयांकडून वर्तवण्यात येत आहे.
रसायनी परिसरात ढगाळ हवामान
रसायनी : रसायनी व परिसरात गुरूवारी सकाळपासूनच वातावरण आकाश आभ्राच्छादित होते. अवकाळी पाऊस रसायनी परिसरात झाला नसला तरी वीटभट्टी मालकाच्या विटांवर प्लास्टीक कागद झाकताना दिसत होते.
आंबा बागायतदारही धास्तावलेले आहेत. गारांचा पाऊस पडला तर कैºयांना डाग पडतात शिवाय आंबे तुटूनही पडतात.
उशिरा आलेला मोहोर गळून पडतो. अशा ढगाळ हवामानामुळे मोहोरावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होतो. उन्हाळी भात पिकावर खोडकिडीचाही प्रादुर्भाव होऊ शकतो, असे एका जाणकार शेतकºयाने सांगितले.
पनवेलमध्ये अवकाळी पाऊस
पनवेल : पनवेलमध्ये काही दिवसांपासून कडक उन्हाने अंगाची काहिली उडाली असताना गुरु वारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शेतकरी मात्र चिंतित आहेत.
दक्षिणेकडील समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने सकाळपासून पनवेलसह विविध भागात वादळसदृश स्थिती निर्माण झाली होती. आज पारा ३९ अंशावर असताना तुरळक पाऊस पडला.
मुरु ड तालुक्यात १५९० हेक्टर क्षेत्राखाली आंबा पिकाची लागवड केली जाते. अजून किमान दोन दिवस जरी ढगाळ वातावरण राहिले तर आंबा पिकास धोका पोहचू शकतो. बदलत्या हवामानामुळे होणाºया नुकसानीवर कृषी खात्याचे लक्ष असून यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील.
- सूरज नामदास, तालुका कृषी अधिकारी, मुरुड

Web Title: Mango farmers in the district are worried about the collapse of the blooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.