जिजाऊ, शिवरायांची विचारधारा भावी पिढीमध्ये रुजली पाहिजे - अदिती तटकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 04:49 AM2018-01-13T04:49:22+5:302018-01-13T04:49:27+5:30

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा जपण्याचा प्रयत्न आपण सर्व जण करीत आहोत. भावी पिढ्यांच्या मनात ही विचारधारा रुजली पाहिजे व आत्मसात करायला हवी.

 Jijau, Shivrajaya ideology should be developed in future generations - Aditi Tatkare | जिजाऊ, शिवरायांची विचारधारा भावी पिढीमध्ये रुजली पाहिजे - अदिती तटकरे 

जिजाऊ, शिवरायांची विचारधारा भावी पिढीमध्ये रुजली पाहिजे - अदिती तटकरे 

Next

महाड/बिरवाडी : राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा जपण्याचा प्रयत्न आपण सर्व जण करीत आहोत. भावी पिढ्यांच्या मनात ही विचारधारा रुजली पाहिजे व आत्मसात करायला हवी. त्यासाठी शालेय जीवनापासून त्यांच्या मनावर जिजाऊ-शिवरायांचे विचार रु जविण्याचा प्रयत्न शिक्षक-पालकांनी करायला हवा या युगपुरुषांबद्दल राजकीय नेत्यांचे विचार ऐकण्याऐवजी भावी पिढींचे विचार काय आहेत ते ऐकण्यासाठी या वर्षीपासून रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने जिजाऊ जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवनावरील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन महाड तालुकास्तरावर करण्यात आले होते. पुढील वर्षापासून ही वक्तृत्व स्पर्धा जिल्हास्तरीय घेण्यात येईल, असे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी पाचाड येथे जाहीर केले.
रायगड जिल्हा परिषद पाचाड ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊंच्या ४२० व्या जयंतीचे आयोजन पाचाड येथे करण्यात आले होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून अदिती तटकरे बोलत होत्या. सर्वप्रथम पाचाड येथील जिजाऊ समाधीस्थळावर जिजाऊंच्या पुतळ्याचे विधिवत पूजन राजिप अध्यक्षा अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाड पंचायत समितीचे सभापती सीताराम कदम, राजिप सदस्य जितेंद्र सावंत, मनोज काळीजकर, संजय कचरे, माजी सदस्य बाळ राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी राजमाता जिजाऊ सभागृहात झालेल्या अभिवादन सभेत अदिती तटकरे यांनी रायगड संवर्धनाचा शुभारंभाचा पहिला श्रीफळ हा किल्ले रायगडप्रमाणेच पाचाड येथेही वाढवण्यात यावा, अशी मागणी करीत रायगड संवर्धनात आपले योगदान असावे ही स्थानिक जनता व लोकप्रतिनिधींची अपेक्षा रास्त असून, त्यांचा सहभाग समितीमध्ये असल्याखेरीज रायगड संवर्धनाचे काम परिपूर्ण होणार नाही. त्यासाठी स्थापन होणाºया संघर्ष समितीचे विचार आपण शासनापर्यंत पोचवू असे आश्वासन देत पाचाडकरांच्या पाणीप्रश्नासाठी विशेष बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावेन, असे अभिवचन दिले. राजकारणात कोणत्याही पदावर असेन अथवा नसेन, परंतु यात असेपर्यंत जिजाऊ जयंती-पुण्यतिथीच्या सोहळ्यास आपण हजर राहू, असे आश्वासन अदिती तटकरे यांनी यावेळी दिले.

महाडमध्ये राजमाता जिजाऊ जयंती साजरी
महाड : राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती शुक्रवारी महाडमध्ये साजरी करण्यात आली. नगरपरिषदेच्या वतीने जिजामाता उद्यानातील जिजाऊंच्या पुतळ्याला नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
या वेळी उपनगराध्यक्षा सुषमा यादव,महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सपना बुटाला, पाणीपुरवठा सभापती भाग्यश्री फुटाणकर, नेहा कदम बेलोसे, नगरसेविका हमीदा शेखनाग आदींसह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Web Title:  Jijau, Shivrajaya ideology should be developed in future generations - Aditi Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड