केबल टीव्ही घोटाळ्याचा तपास इन्कमटॅक्सकडून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:55 AM2017-12-07T00:55:24+5:302017-12-07T00:55:24+5:30

केबल टीव्ही ग्राहकांना पावती न देता, त्यांच्याकडून कोट्यवधी रु पयांची माया जमवलेल्या घोटाळ्याचा आता आयकर विभागानेही तपास सुरू केला आहे.

The investigation of the cable TV scam started by IncomeTax | केबल टीव्ही घोटाळ्याचा तपास इन्कमटॅक्सकडून सुरू

केबल टीव्ही घोटाळ्याचा तपास इन्कमटॅक्सकडून सुरू

googlenewsNext

अलिबाग : केबल टीव्ही ग्राहकांना पावती न देता, त्यांच्याकडून कोट्यवधी रु पयांची माया जमवलेल्या घोटाळ्याचा आता आयकर विभागानेही तपास सुरू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील केबलचालक तसेच मल्टीसिस्टीम आॅपरेटर्सचे धाबे दणाणले आहेत.
अलिबाग येथील केबल व्यावसायिकांनी ग्राहकांची लुबाडणूक करून सुमारे ५० कोटी रु पये कमावल्याची तक्र ार येथील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी जिल्हा प्रशासनासह आयकर विभागाकडे केली होती. जिल्हा प्रशासनाकडे गेले सहा महिने सुरू असलेल्या या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकाºयांनी हे प्रकरण निकालावर ठेवले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी याबाबत कोणता निणर्य देतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील बहुतांश केबलचालक हे ग्राहकांना पावती देत नाहीत. अलिबाग येथील केबलचालक त्यांच्या ग्राहकांना गेली दहा वर्षे कोणत्याही प्रकारची पावती न देता, ग्राहकांकडून विनापावती फी व विक्र ीकर वसूल करीत आहेत. असा अहवाल अलिबागच्या तहसीलदारांनी याआधीच जिल्हा प्रशासनाना दिला होता. केबलचालक वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न आयकर, तसेच विक्रि कर विभागाचे कर बुडवून कमवित आहे. त्यामुळे त्यांच्या अवैध उत्पन्नाची चौकशी होण्याबाबत तीनशे पानांच्या भरभक्कम पुराव्यांसह आयकर विभागाकडे संजय सावंत यांनी तक्र ार दाखल केली होती. त्या तक्र ारीची दखल आयकर विभागाने घेत प्रकरणाचा तपास सुरू केल्याचे सावंत यांना माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरातून समोर आले आहे.
या तक्र ारीमधील सर्वात धक्कादायक बाब आयकर विभागाच्या नजरेस आणून देताना, सावंत यांनी अलिबाग येथील केबलचालक हे आता केबल व्यवसाय हा त्यांच्या पत्नीच्या नावे असल्याचा दावा करीत असले, तरी त्यांच्या पत्नीने अलिबाग २०१६ साली नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक लढविली आहे. त्या नगरसेविका म्हणून निवडूनही आल्या आहेत. त्यांनी त्या वेळी निवडणूक आयोगास प्रतिज्ञापत्र सादर करताना या केबल व्यवसायाविषयी काहीही नमूद केलेले नाही, हे सांगताना त्यांच्या प्रतिज्ञापत्राची प्रतही आयकर विभागाकडे सादर केली आहे. तसेच याच प्रतिज्ञापत्रात पती-पत्नी दोघांनीही आयकर भरत नसल्याचे लिहून दिले आहे. त्यांनी स्वत:चे पॅन कार्ड नंबरही नमूद केलेले नाहीत. वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न तेही ग्राहकांकडून विनापावती गोळा करणारे हे दाम्पत्य निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांचे आयकर विवरण व पॅन कार्ड नंबर दर्शवित नसल्याने त्यांची व त्यांच्याशी संबंधित सर्वांची करचुकवेगिरी करून राष्ट्रीय उत्पन्नाची हानी केल्याप्रकरणी आयकर विभागामार्फत तपास सुरू झाल्याने जिल्ह्यातील इतर केबलचालकांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

Web Title: The investigation of the cable TV scam started by IncomeTax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.